
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.28 जुलै-
रेल्वेमध्ये भेळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
आनंद पगारे व निलेश पगारे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असून हे दोघेही धावत्या रेल्वेतून भेळ विक्रीचा व्यवसाय करत होते अशी माहिती समोर येत आहे.
एकाचा मृतदेह दोन तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्याचा मृतदेह रेल्वे लाईनच्या बाजूला आढळून आला आहे.
हा घातपात की अपघात? याबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
सदर घटनेची नोंद आरपीएफ घेत आहेत. सविस्तर माहिती लवकरच..

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…