नाशिक ग्रामीण

स्विप्ट कार व बाईकचा भीषण अपघात, चांदवड तालुक्यातील एकाच मृत्यू तर एक जखमी

स्वीप्ट कार व बाईकचा भीषण अपघात, चांदवड तालुक्यातील एकाच मृत्यू तर एक जखमी


वेगवान नाशिक / अरुण थोरे

निफाड,ता. 28 जुलै 2024- भरवस फाटा ते शिर्डी राज्य मार्गावर रात्री १२.३० च्या दरम्यान शिरवाडे फाटा येथे स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात एक युवक ठार तर एक जबर जखमी झाला.

समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे महाराष्ट्रात बदाबदा पाऊस पडणार !

सविस्तर माहिती अशी की, आज रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान आश्वी उंबरी ता.संगमनेर येथील मारुती स्विफ्ट कार एम.एच २० सी.एस ०२०२ ही सोनेवाडी बु.येथे दर्शन घेऊन भरवस फाट्याकडून कोळपेवाडीकडे जात असतांना बजाज अव्हेंजर एम.एच १५ एफ.आर १९०६ या मोटारसायकल व स्विफ्टची जोरदार धडक झाली.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नाशिक बाजार समितीचे भाजीपाल्याचे बाजारभाव

त्यात मोटारसायकल वरील दिपक सुधाकर टोपे वय ३५ रा.पिंपळद ता.चांदवड याचा पाय तुटून जोरदार रक्तश्राव झाल्याने उपचारासाठी नेत असतांना दिपकचा मृत्यू झाला. रोहित नामदेव लामखडे वय २५ रा.दरसवाडी ता.चांदवड हा जबर जखमी झाला असून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

पो.पा.रामनाथ तनपुरे यांनी घटनेची माहिती लासलगाव पोलीस ठाण्यात कळवली. स.पो.नि भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.

तर युवकाचा जीव वाचला असता

या अपघातात दिपक याचा पाय तुटून रक्तश्राव होत होता. याप्रसंगी उपस्थितांनी १०८ सह परिसरातील सर्वच रुग्णवाहिकांना फोन करूनही तब्बल दीड तास एकही रुग्णवाहिका आली नाही त्यामुळे उपचाराभावी पायातून जोरदार रक्तश्राव होऊन दिपकचा दुर्दैवी मृत्यू झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!