राज्यातील शेतक-यांना मोफत वीज मिळण्याचा आदेश निघाला
राज्यातील शेतक-यांना मोफत वीज मिळण्याचा आदेश निघाला
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला //दिनांक28जुलै 2024-राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत केलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे.
त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी साडेसात अश्वशक्तीपेक्षा कमी अश्वशक्ती असलेल्या पंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात ६० लाखाहून अधिक कृषीपंपधारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अधिवेशनात मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्याचा अध्यादेश कधी निघणार, मोफत वीज कधीपासून लागू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.
अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ पर्यंत पुढे पाच वर्षांसाठी ही मोफत वीज असणार आहे. भरपाईपोटी सरकार १४ हजार ७६० कोटी रुपये महावितरणला देणार आहे.
या योजनेचा तीन वर्षांनी आढावा घेऊन निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ अशा वेगवेगळ्या संकटांचा सामना करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक भार हलका होणार आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये