अंगी अनेक कलागुण आहेत, शिकायची प्रबळ इच्छा आहे, मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, यासाठी विद्यालयाच्या शिक्षिका आशा अहिरराव यांनी माजी विद्यार्थी यांना मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत या माजी विद्यार्थ्यांनी वह्या, चित्रकला वह्या, रंगपेट्या, पेन, पेन्सिल, रबर, शॉपणार असे विविध लेखन साहित्य त्याच बरोबर खेळाचे साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर शाळेला भेट म्हणून दिले आहे.
यावेळी नितीन पवार, नारायण पवार, महेश पाटील, निवृत्ती आहेर, प्रभाकर आहेर, राहुल पवार, खंडेराव वाघ, शरद पवार, गिरीश देवरे, जितु महाजन, नितीन सूर्यवंशी, बाजीराव पवार, पंडीत जाधव, कुडू चव्हाण, राजेश देवरे, गणेश पगार, आबा आहेर, जितू आहेर, स्मिता, कुमुदिनी, वनिता, प्रभावती, योगिता, चारुशिला, कावेरी या मदतीचा हात पुढे करणाऱ्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक खैरणार यांनी विशेष आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.