नाशिक ग्रामीण
व्हीकेडी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सांस्कृतिक दिवस तर एसकेडी स्कूल मध्ये कलागुणांचे सादरीकरण

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील भावडे येथील एस. के. डी. इंटरनॅशनल स्कुल व व्ही. के. डी. इंग्लिश मिडियम स्कूल, अँण्ड ज्युनिअर कॉलेज, येथे २२ ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा होत असून, शासनाने ठरवून दिलेल्या उपक्रमानुसार कौशल्य व डिजिटल तंत्रज्ञान दिवस, व सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला.
व्हि.के.डी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. के. वाघ.यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख क्रांती सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा अहिरे यांनी केले. या कार्यक्रमात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतांना विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेले विविध कलागुण दाखवत गाणी, नाटिका, आदी सादर केले. लहान गटातील मुलांनी विविध वेशभूषा करून कार्यक्रमाला रंगत आणली. सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय खाद्य संस्कृती जोपासत वेगवेगळे खाद्यपदार्थ स्वतः तयार केले.
एस.के.डी विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक एस.जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती पासून विविध वस्तू बनवल्या, त्यानंतर पाककला, स्वच्छता, मांडणी, तंत्रज्ञान वापरासंबंधी नाटिका सादर करून आपल्यातील कलागुण विद्यार्थ्यांनी दाखवले. यावेळी माती परीक्षण उपक्रम करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन त्या स्थळासंबंधी माहिती जाणून घेतली. सदर कार्यक्रमासाठी रुद्राक्ष सोनवणे या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले.
शिक्षण तंत्रज्ञान वापर या विषयांतर्गत विद्यालयाच्या शिक्षिका सविता विश्वभर यांनी तंत्रज्ञान वापरावरील नाटिका विद्यार्थ्यांसोबत सादर केली. त्याचप्रमाणे विद्यालयाचे शिक्षक सुधीर सोनवणे यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग यावर प्रात्यक्षिक सादर केले. रुद्राक्ष सोनवणे, भार्गव जाधव आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकासह उपक्रम सादर केले.
सदर उपक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक शंकर पवार, सुधीर सोनवणे, अजय बच्छाव, राहुल पाटील, कुणाल शिरसाठ, निवृत्ती आहेर, सविता विश्वंभर, अनुजा रौंदळ, कावेरी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.