नांदगांव च्या सीमेवर अवतरली बिबट्याच्या जोडी
नांदगांव च्या सीमेवर अवतरली बिबट्याच्या जोडी

वेगवान नाशिक /मारुती जगधने
नांदगाव / दिनांक 26जुलै 2024—–दि २४ जुलै रोजी नांदगांव नजिक फुलेनगर येथे बिबट्याचे जोडीचे नागरीकाना दर्शन झाले.म्हणजे बिबट्या आता नांदगांव शहराच्या शिवावर येऊन ठेपला या घटनेमुळे फुलेनगर,श्रीरांमनगर,गिरणानगर परीसारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ? या भागात हरणांचे शेकडोच्या संख्यने वावर असल्याने आता या भागात बिबट्याच्या जोडीने इंटरी केल्याने नागरिकांचे इंडिकेटर लागले असून सध्या खरीप पिकांची चांगल्या प्रमाणात वाढ झाल्या वन्यप्राण्याना लपण झाले आहे .फुलेनगर,श्रीरामनगर,क्रांती नगर,साकोरा,हिंगणवाडी,हिसवळ आदी भागात हरणांचा मुक्त संचार असल्याने नाग्या-साक्या फाॅरेस्ट मध्ये बिबट्याची जोडी सोडली असावी असा अंदाज नाकरीक बांधतात.
या बाबत् सविस्त आसे की बिबट्या, ज्याला इंग्रजीत “Leopard” म्हटले जाते, हा एक मोठा आणि शक्तिशाली मांजरीसारखा प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव Panthera pardus असे आहे. बिबट्याचे वावरण हे खूप व्यापक आहे, कारण तो विविध वातावरणांमध्ये राहू शकतो.बिबट्यांचा वावर आफ्रिका, मध्यपूर्व, भारत, चीन, आणि दक्षिणपूर्व आशियातील अनेक भागांमध्ये आहे. ते जंगल, गवताळ प्रदेश, पर्वत आणि अगदी मानव वस्त्यांच्या जवळपास देखील आढळतात.
बिबट्या बहुधा एकल जीवन जगतात आणि ते विशेषतः रात्री सक्रिय असतात. ते दिवसात त्यांच्या विश्रांतीच्या जागी झोपतात आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात.
बिबट्या हे मांसाहारी प्राणी आहेत आणि ते विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. त्यांच्या आहारामध्ये हरिण, ससे, माकड,शेळी,कुञा, पक्षी आणि कधीकधी लहान प्राणीही असतात.
अलिकडे बिबट्यांच्या संख्येत घट होत आहे कारण त्यांचे नैसर्गिक वासस्थान कमी होत आहे आणि मानव-प्राणी संघर्ष वाढला आहे. यामुळे बिबट्यांचे संरक्षण हे एक महत्वाचा मुद्दा बनला आहे.
बिबट्यांची त्वचा त्यांच्या ओळखीसाठी विशेष आहे. त्यांच्या अंगावर असलेले ठिपके त्यांना विशेष रूप देतात आणि त्यांच्या पर्यावरणात लपण्यास मदत करतात.
बिबट्यांच्या वावरणाचे हे काही मुख्य पैलू आहेत. त्यांचे निरीक्षण आणि संरक्षण दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
फलेनगर येथे दि २४ जुलै रोजी राञी ९ वा नांदगांव मनमाड रोडवर मातोश्री मंगल कार्यालया जवळ बिबट्याच्या जोडीचे (दोन बिबटे) दर्शन झाले यावेळी BSNL चे दोन कर्मचारी दुचाकीवरुन प्रवास करीत असताना त्याच्या नजरेत आले या भागात पथदिप असल्याने रस्ताओलांडताना बिबट्याचे स्पस्ट दर्शन झाले तेव्हा या दोघा कर्मचारी सावध पविञा घेतला बिबटे पास होताच ते तेथून निघाले.
दरम्यान सुरेश पाटील यांना देखील बिबट्या नजरेत आले तेव्हा या दोघां बिबट्यानी कोंबड्याची शिकार केल्याचे सांगिल या मुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
सध्या बिबट्याचा वावर फुले नगर, श्रीराम नगर हिंगणवाडी या परिसरात असून या भागात मोठे जंगल आहे लागून नाग्या- साक्या धरण व मोठे जंगल देखील आहे याच भागात हिसवळ ,हिंगणवाडी,फुलेनगर जंगल गावांना व शिवांना लागून डोंगर दर्या व जंगल असल्याने बिबट्याला लपण्यास मोठा परीसर आहे गत एक महिण्यात पासून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक नागरीक सांगतात वनविभागाने अधिक वावर आसलेल्या ठिकाणी चोकशी करून उपाय योजना कराव्यात अशी मागणी आहे .
दरम्यान चिंचविहीर बोढरे येथे बिबट्याचा वावर असून चिचविहीरचे शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती सुधारत आहे .
दरम्यान फुलेनगर येथे बिबट्याची जोडी असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष भेटीत सांगण्यात आले .

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये