मनमाड नगरपालिकेच्या विरोधात चिखलात नागरिकांचे लोळून आंदोलन
मनमाड नगरपालिकेच्या विरोधात चिखलात नागरिकांचे आंदोलन

थ्वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव , दि. 26 जुलै 2024 शुक्रवार, नांदगाव तालुका प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये जाण्यासाठी मुख्य रस्ता म्हणून येवला रोड लगत करुणा हॉस्पिटलच्या बाजूने श्रावस्ती नगर कडे जाणारा रस्त्याच्या वापर केला जातो. गेल्या चार वर्षापासून सदरील रस्त्यावर पाण्याच्या टाकीसाठी जोडणारे पाईपलाईन रस्ता करून टाकण्यात आला होता. क्या कारणाने सदर रस्त्याची दुरावस्था झालेली असल्यामुळे मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी पाण्याच्या डबक्यामध्ये दिनांक 26 जुलै 2024 रोजी शुक्रवारी लोटांगण घेऊन आंदोलन करत नगरपालिकेचा निषेध केला.
नागरिकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे . तसेच करंजवण योजनेकरिता सर्व चांगले रोड खोदले जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रभाग क्रमांक 15 मध्ये चिखल झालेला असून त्यावर पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. पाऊस आल्यानंतर सदर प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था होत असून सदर रस्त्याने
शांतीनगर, महानंद नगर, श्रावस्ती नगर, वेलंकनी नगर,, गोपाल नगर तसेच सेंट अलिबेल हायस्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक हेजा करतात. तसेच या रस्त्यावर हॉस्पिटल, मेडिकल आहेत यामुळे आजारी असलेल्या व्यक्तीला आणण्यासाठी दुरवस्था होत आहे. सदर रस्त्यावर वेळोवेळी आजपर्यंत मनमाड नगरपालिकेला सदर रस्त्याची दुरुस्तीची मागणी केलेली असून आज पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल मनमाड नगरपालिकेने घेतलेली नाही.
नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराचा विकास झाला असा गाजावाजा होत असून जर विकास होत असेल तर या रस्त्यांची दुरावस्था कशी याबाबत आंदोलनकर्त्यांनी दिनांक 25 जुलै 2024 रोजी शुक्रवारी मनमाड शहरातील रस्त्याने पाण्याच्या टप्प्यामध्ये लोळून आंदोलन करत मनमाड पालिकेचा निषेध करत प्रश्न उपस्थित केला. मनमाड शहराचा विकास गेला कोठे या समस्या वरून दिसून येते.
