नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आशा व गटप्रवर्तक गटप्रवर्तक महिलांनी ठिय्या आंदोलन ठिय्या आंदोलन केलं
नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आशा व गटप्रवर्तक महिलांनी ठिय्या आंदोलन केले

वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव दि.25 जुलै 2024 गुरुवार
प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत आंदोलन केले . आशा व व गटप्रवर्तक यांना महाराष्ट्र राज्य सरकारने मानधन वाढी संदर्भात जीआर काढलेला आहे. परंतु मानधन मानधन तसेच उर्वरित मिळणारे अनुदान अद्याप पर्यंत आशा व गटप्रवर्तक यांना मिळालेले नसल्याने नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आशा व गटप्रवर्तक महिलांनी दिनांक दिनांक 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी मांडत आंदोलन करण्यात आले.
यावेळी आशा व गट प्रवर्तक यांनी यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. आशा सेविकांना मिळणारे मानधनात वेतन चिठ्ठी मिळावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, किमान वेतन लागू करण्यात यावे. जाहीर केलेले वाढीव दहा हजार मानधनाचा जी आर काढुन अदा करण्यात यावे. राज्य सरकारने कर्मचारी म्हणून समावेश करावा,आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन चालू करण्यात यावे आदी मागण्यांची निवेदन नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री नवले यांना देण्यात आले.
