सरकारी माहिती

शेती विजपंपांला मोफत विज मिळणार.. अजित पवार

मुख्यमंत्री " बळीराजा " मोफत विज योजना


वेगवान नाशिक / भाऊसाहेब र. हांडोरे

राज्यातील साडेसात एचपी अश्व शक्ती क्षमतेपर्यंतच्या

विज पंप  असणार्या  शेतकऱ्यांना मोफत विज….

महाराष्ट्रातील  शेतकरयांना मिळणार दिलासा ….

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सिन्नर : दि. २५ जुलै २०२४ – समाजाचा आर्थिक कणा व जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी अनेक कारणांमुळे आर्थिक कोंडीत सापडला आहेत .  अनियमित पाऊस व नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक नवीन योजना जाहीर केली आहे व त्याची अंमलबजावणी संदर्भात विज महामंडळाला योजना मार्गी लावण्यासाठी सुचनाही देण्यात आल्या आहे.

”  मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – सन २०२४ ”

जगाचा हवामान बदल आणि अनिमित्त पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसाय दुष्परिणाम झाला असून  शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती वाढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरता राज्य शासनाने शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे . परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने राज्यातील साडेसात एचपी पर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याकरता धोरण ठरवले आहे .

राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार ( वित्त व नियोजन ) यांनी दिनांक 28 2 2019 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 आणि खालील प्रमाणे घोषणा केली आहे

भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची जाणीव आपल्या झाली मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणी बदलामुळे मोसमी हवामान बदल होत असून या त्याची दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी  ” मुख्यमंत्री बळीराजा विज योजना ” मी आता घोषित करीत आहे. यावर शेतकऱ्या याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44 लाख 3000 शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना  मोफत वीज पुरवली जाईल याकरता 14760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  1. त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदतीचा दृष्टीने व त्याची थकबाकी वाढूवु न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 20२४ राबवण्याची  योजना बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भव्य लागत आहे अशा सापडलेल्या व अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एचपी आहे शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून  मोफत विज देण्यासाठी ” मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ ” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

…  ….      योजनेचा कालावधी  …. …..

सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यात मान्यत देण्यात आली आहे. मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल…

—–  विज महावितरण कंपनीला सुचना  —–

सदर योजना शासन निर्णय नुसार राबविण्याची जबाबदारी संपूर्णपणे महावितरण कंपनीची आहे. आवश्यकतेनुसार महावितरण कंपनीने सदर योजनेची कार्यपद्धती तयार करावी. अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आले.

** … महावितरण कंपनीने तात्काळ  अंमलबजावणी करून शासनास नियमितपणे तो मासिक अहवाल सादर करावा … **

चिंताग्रस्त व अडचणीत आलेले सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार असल्याने या योजनेचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे..

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!