प्रभाग 24 मध्ये आता नागरिकांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्हीची नजर…! :-मा नगरसेवक प्रविण तिदमे
प्रभाग 24 मध्ये आता नागरिकांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्हीची नजर...! :-मा नगरसेवक प्रविण तिदमे
वेगवान नाशिक /नाशिक नितीन चव्हाण:, ता २४ जुलै २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्या प्रयत्नातून शिवसेना नगरसेवक तथा (महानगरप्रमुख) प्रवीण तिदमे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
सिडको परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चैन स्नेकिंग, घरफोडी, टवाळखोरांचा उद्रेक, महिलांचे मनी मंगळसूत्र ओरबडणे, वॉच ठेवून मोबाईल खेचणे , बघायला मिळत आहे.
हे सर्व प्रकार घडत असताना चोर मात्र सापडत नाही किंवा गृहिणीचे सोने चोरीला गेले तर फक्त पोलिसात तक्रार होत होती.
पण वर्षानुवर्ष तपास लागत नव्हता यासाठी नवीन नाशिक भागात प्रभाग क्रमांक 24 मध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक प्रवीण तिदमे यांना केली.
या संपूर्ण गोष्टीची बाब लक्षात घेत घाबरत वावरणाऱ्या भगिनींना तसेच प्रभागातील नागरिकांना प्रवीण तिदमे यांनी अखेर न्याय दिला.
संपूर्ण प्रभाग क्रमांक 24 हा सीसीटीव्ही मय केला असून प्रभागातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही बसविण्यात आले बसविण्यात आलेले आहे.
सीसीटीव्ही लवकरात लवकर चालू होणार असल्याचे प्रवीण तिदमे यांनी सांगितले आहे…
——————
*या ठिकाणी लावण्यात आले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे*
- १) श्री राम मंदिर चौक , जूने सिडको
२) श्री सिध्दी विनायक चौक, जूने सिडको
३) महत्मा फुले चौक, जूने सिडको
४) श्री गणपती मंदिर चौक, गोविंद नगर
५) अपेक्स हॉस्पिटल समोरील जॉगिग ट्रक, गोविंद नगर
६) श्री कृष्ण मंदिर, जूने सिडको
७) श्री नवग्रह शनि मंदिर चौक, जूने सिडको
८) श्री स्वामी समर्थ मंदिर, वेकुठेश्वर मंदिर
९) श्री हरेस्वर मंदिर, जूने सिडको
१०) शॉपिंग सेंटर मैदान, जूने सिडको
११) श्री साई बाबा चौक परिसर
१२) श्री गजानन महाराज चौक शांती नगर
१३) श्री महादेव चौक, शांती नगर
१४) श्री सप्तश्रुंगी चौक, शांती नगर
१५) श्री दुर्गा माता चौक , महारानाप्रताप चौक
१६) श्री खंडेराव चौक, शांती नगर
१७) सिध्दी विनायक चौक, पांगरे मळा
१८) राजे छत्रपती जिम व श्री हनुमान चौक,जूने सिडको