येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापतीपदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापतीपदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला,दि.23 जुलै 2024 :- कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या नामांकित येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर निवड झालेले सभापती श्री.किसन धनगे आणि उपसभापती ॲड.बापू गायकवाड यांचा निश्चित कालावधी अतिशय उत्कृष कामे केली. त्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने पुढील कालावधीसाठी आज बाजार समिती सभागृहात सभा संपन्न झाली. आज उपस्थित संचालकांच्या बैठकी सौ.सविता पवार यांनी सभापती पदासाठी तर सौ.संध्या पगारे यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने सौ.सविता पवार व सौ.संध्या पगारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
गेल्या वर्षी संपन्न झालेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी आमदार मारुतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या संयुक्त पॅनलने बहुमत मिळवले होते. त्यानुसार त्यांच्या सहमतीने श्री.किसन धनगे यांची सभापती पदी तर उपसभापती पदी ॲड.बापू गायकवाड निवड करण्यात आली होती. त्यांच्या आवर्तनाच्या अखेरीनंतर सभापती पदासाठी सौ. सविता पवार व उपसभापती पदी सौ. संध्या पगारे यांची निवड करण्यात आली.
त्यानंतर सौ.सविता पवार व संध्या पगारे यांनी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने सभापतीपदी सौ.सविता पवार व उपसभापतीपदी सौ.संध्या पगारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार मारुतीराव पवार, जेष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती किसनकाका धनगे, संभाजी पवार, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, संचालक संजय बनकर, संतू पाटील झांबरे, छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, नंदूशेठ अट्टल, भरतशेठ समदडीया,अर्जुन डमाळे, कांतीलाल साळवे, लताबाई गायकवाड, संजय पगार, रतन बोरनारे, बापू काळे, दिलीप मेंगाळ, भाऊसाहेब धनवटे, दीपक गायकवाड, भास्कर येवले, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, विठ्ठल आठशेरे, विठ्ठल जगताप, अर्जुन कोकाटे, पी.के.काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये