शहा – पंचाळे येथे उद्या गंगांगीरी महारांचा ” महाकुंभ “सप्ताह ध्वजारोहण…
महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते होणार ध्वजारोहण !!
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र. हांडोरे
सिन्नर: दि. २३ जुलै २०२४ सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे दहा ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या महंत ह.भ.प.गंगांगीरी महाराज सोहळ्याचे ध्वजारोहण महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते होणार असून या वेळी नाशिक चे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे. आमदार- माणिकराव कोकाटे.भास्कगिरी महाराज.शिवानंदगिरी महाराज.रमेशगिरी महाराज यांच्या सह जिल्हा परिषद सदस्य सिमिंतिनी कोकाटे.राजेश गडाख.नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या भव्य सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन सोहळा समिती चे सदस्य या. सरपंच कैलास थोरात व अरूण थोरात यांनी केले आहे.
तब्बल बारा वर्षे च्या प्रदिर्घ मागणी नंतर सिन्नर तालुक्याला या सप्ताहाचा मान मिळाला आहे.संत सद्गुरू योगीराज गंगांगीरी महाराज सरला बेट यांच्या वतीने सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे होणाऱ्या १७७ व्या फिरत्या नारळ सप्ताहाचे ध्वजारोहण बुधवारी दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ११ वा.विविध मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे
ध्वजारोहण सोहळा निमित्त अनेक ठिकाणांहून प्रचंड प्रमाणात भाविक येणार असून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे या महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे अहवान सप्ताह समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे
या सप्ताहा व ध्वजारोहण कार्यक्रमासाठी परिसरातील गावांमध्ये स्वच्छ रस्ते व रंग रंगोटी करून सडा रांगोळी काढून आजुबाजुच्या परिसरात स्वागतासाठी कमाणी
उभारण्यात आले आहे. ढोल ताशा पथक व लेझीम पथक तयार करण्यात आले असून सर्व रस्ते सुशोभित करून सज्ज झाले आहेत .या कार्यक्रमाला खास आकर्षक वाद्य व नृत्य पथक तयार करून स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
५१ फुट उंच व१२मिटर कापडी लांब असलेल्या या ध्वजारोहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडण्यासाठी परिसरातील अनेक गावे सर्व स्तरातून मदत करीत आहेत, यात शहा गावातील ग्रामस्थांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
*** लेने को हरिनाम !
देणे को अन्नदान !!
तरणे को लीनता !!!
डुबने कोअभिमान !!!! ****
या सप्ताहा दरम्यान भारतातील सर्वात मोठे भव्य ” कृषी प्रदर्शन आयोजित केले असून सलग आठ दिवस चालणार्या कृषी प्रदर्शनात पाच लाख भाविक सहभागी होणार असल्याचे संयोजकांकडुन सांगितले आहे. कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्टॉल लावण्यासाठी नांव सुरू झाली आहे..
या सप्ताहा यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील आ.माणिकराव कोकाटे यांनी विशेष प्रयत्न करत आहे. या सप्ताहा दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्यासाठी आपणं आग्रह धरणार असुन ते आवर्जून हजर राहतील अशी अपेक्षा आ.माणिकराव कोकाटे व्यक्त केली आहे.