वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव , दि. 23 जुलै 2024 मंगळवार , प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव या महसुलीच्या गावापासून जवळच असलेल्या गावजारा येथील भोई समाजाची वस्ती मधील महिलांनी अतिशय सुंदर असा उपक्रम शिक्षकांच्या मदतीने सुरू केला.
गावदरा गावात कोणत्याही सणांचे पूजन असेल तर त्या पुजनामध्ये जो दक्षिणा येईल जे पैसे येतील तो निधी जमा होईल तो निधी शाळेला, गावातील परिसराला उपयोगी आणायचे ठरविले. पूजेचे जे पैसे असतील तेवढेच पैसे शिक्षक देखील मदत करतील असे जिल्हा परिषद शाळेचे गावदरा येथील मुख्याध्यापक विलास सोनवणे यांनी सदर महिलांच्या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून यावेळी शब्द दिला.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास सोनवणे यांचे मित्र सतीश संदाशिव पाचोरा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पाट्या व पेन्सिल यांचे वाटप केले. चांगल्या उपक्रमाचा आमची छोटीशी भेट म्हणून सतीश संदानशिव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तर शाळेचे मुख्याध्यापक विलास सोनवणे यांनी सर्व महिलांना एकत्र करून सांगितले की तुमचे जे पैसे सण उत्सवाच्या जसे वटसावित्री पौर्णिमा,
हरितालिका वगैरे सनामधून जे पैसे पूजेला जमतील तेवढेच पैसे मी स्वतः देईल आणि आपण त्या पैशांचे झाडे लावून त्या झाडांना जगण्यासाठी जाळी आणून ते जागवायचे आहे असे बोलताना म्हणाले. यावेळी सर्व महिलांनी एकमुखाने वकार दिला.
यावेळी सुनंदा शिवते आशा शिवदे, मंगलाबाई शिवदे, लिलाबाई शिवदे, मनीषा शिवदे, वैशाली शिंदे, सोनाबाई शिवदे आधी महिला उपस्थित होत्या. या उपक्रमाचे सर्व गावातून कौतुक करण्यात आले. तर शाळेचे मुख्याध्यापक विलास सोनवणे यांनी सर्व महिलांना व मित्र सतीश यांचे आभार मानले.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.