लामरोडवरील इमारतीवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

वेगवान नाशिक/Wegwan Nashik:- देवळाली कॅम्प 20 जुलै :-
नाशिकरोड देवळाली कॅम्प रस्त्यावरील अष्टपद हाईट या नव्याने उभी राहणाऱ्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून रोहित भाऊसाहेब वाजे (वय 23)रा देवी मंदिर, देवळाली कॅम्प याने उडी मारून आत्महत्या केली.दरम्यान अचानक काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला म्हणून साईटवर कामगारांनी आवाज आला त्या ठिकाणी गेला असता एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला दरम्यान या घटनेची माहिती ठेकेदार,बांधकाम व्यावसिकाला दिली.सदर घटना उपनगर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.मयत रोहित भाऊसाहेब वाजे याच्या दुचाकी गाडीमुळे त्याची ओळख काही वेळेत होऊ शकली. रोहितच्या पश्चात आई वडील एक बहिण असा परिवार आहे. घरातील एकमेव असल्याने सर्वांचाच तो लाडका होता.
