वेगवान नाशिक / शशिकांत बिरारी ¨
बागलाण ( कंधाणे ) प्रतिनिधी : दि.१९ जुलै २०२४ दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी कंधाणे येथील अभिनय इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी भागडा डोंगर परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली असल्याने वनविभाग व वन प्रेमी कडुन या उपक्रमाचे कौतुक केले जात आहेत.
मानवाचा पर्यावरणातील वाढत चाललेला हस्तक्षेप, जागतिकीकरणाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड, यामुळे जागतिक पातळीवर तापमान वाढ होऊन वस्तुमानात बदल जाणवू लागले आहेत.यावर सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु उपाय योजना करण्यासाठी पाहिजे असे पावलं उचलली जात नाही परंतु कंधाणे येथील अभिनय इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ” एक झाड मोलाचे या उपक्रमाअंतर्गत गेल्या चार पाच महिन्यांपासून विविध जातींच्या बिया जमा करून त्यांनी स्वतः रोपं तयार करून त्याचं जतन केले व काल शुक्रवारी सकाळी एक दिवसीय शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने येथील भांगडा डोंगर परिसरात जवळपास दोनशे नानाविध प्रकारचे झाडांची लागवड केली आहे त्यांचे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
येथील अभिनय इंग्लिश मिडीयम स्कूल प्राचार्य श्री जितेन्द्र भांबरे सर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सीझनमध्ये घरी आणलेल्या फळांची बिया एकत्र जमा करण्याच्या सूचना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या झाडांची बिया संकलित करून शाळेत आणुन दिल्या होत्या.जमा झालेल्या बियांचे वर्गीकरण करून शाळेच्या आवारात त्याची रोपं तयार करून ती तयार झालेली रोपे सध्या पावसाळा सुरू असल्याने शाळेने रोपण करण्याचे ठरविले व यानुसार भागडा डोंगर परिसरात एक दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करून स्नेहभोजनासह वक्षारोपण करण्यात आले. यावेळी दोनशे रोपांची लागवड केली. वनरक्षक नवनाथ मोरे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना पर्यावरण रक्षणासाठी शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बिरारी. प्राचार्य जितेंद्र भांमरे. काॅलेजचे प्राचार्य पवन काकुळते सर.वनरक्षक नवनाथ मोरे.ग्रामपंचायत सदस्य शशिकांत बिरारी.किशोर वाघ . रोहित सुर्यवंशी.सोनल ठाकरे.अमोल खरणार. रुचिता सोणवणे.वर्षा भांमरे.ललिता वाघ.विध्या मांडवडे. किर्ती वैष्णव.रोशणी बिरारी.साक्षी सुर्यवंशी. गणेश सोनवणे.विजय गायकवाड.गोरक बागुल.गोदाबाई सोनवणे .मनोज सोणवणे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.