
नाशिक नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव दि.18 जुलै –
शासनाने वेळोवेळी सावकारी कायद्यांमध्ये सुधारणा करत अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व जनतेला आर्थिक छळातून सोडवण्यासाठी विविध प्रयत्न केले.
अशाही परिस्थितीत अगदीच मध्यमवर्गीय लोकांना खेळते आर्थिक भांडवलासाठी प्रचलित अशा भिशीचा व्यवसाय काही लोक करत असतात. भिशी हा व्यवसाय वैध किंवा अवैध पद्धतीने सुरू आहे.मात्र मनमाड शहरात दबक्या आवाजात अवैध भिशी किंवा सावकारी व्यवसाय डोके वर काढताना दिसत आहे.हल्ली मोठे व्यावसायिक देखील अशा व्यवहारात गुंतलेले दिसतात.यामाध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार होतात.परिणामी फसवणुकीचे काही प्रकार घडत असतात मात्र कुणी याबाबत फारसे बोलत नाहीत.विविध प्रकारच्या सेटिंग केल्या जातात.
अशाच एका प्रकरणात भिशी चालवणाऱ्या एका तरुण व्यक्तीच्या कुटुंबीयांना भिशीचे पैसे परत द्यावेत म्हणून मारहाण केल्याची घटना घडली आहे. भिशी चालवणारा तरुण मात्र फरार असल्याची चर्चा नागरिकात आहे.
मनमाड शहरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे हे चित्र समाजासाठी चिंताजनक आहे. याबाबत पोलीस प्रशासन नक्की काय भूमिका घेत आहे? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.कारण अशा भिशी किंवा अवैध सावकारीची कोणत्याही प्रकारची नोंद सरकार दरबारी नसल्याने किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला नसल्याने पोलीस हतबल झाल्याचे दिसतात.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…