आरोग्य

वर्षभर सर्वांगसुंदर योगा शिकवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ


वेगवान नाशिक / बाबा पवार

 

देवळा : सलग १०३ तास योगा करून ग्रीनिज बुकमध्ये नोंद झालेल्या आंतरराष्ट्रीय योगाचार्य डॉक्टर प्रज्ञा पाटील यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात सर्वांगसुंदर योगा शिकवण्याचा उपक्रम पंचायत समितीचा शिक्षण विभाग व देवळा रोटरी क्लबने सुरू केला आहे.

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin
जि.प. विद्यानिकेतन देवळा येथे आयोजित कार्यक्रमात योगाचार्य डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्राचार्य सतिश बच्छाव, डॉ.व्ही.एम.निकम, डॉ.व्ही.डी.आहेर, डॉ.सुनिल आहेर, अरुण पवार, प्रितेश ठक्कर, कैलास बागुल, सुनिल देवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन सुनिल देवरे यांनी केले.

यावेळी डॉ. प्रज्ञा पाटील यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व व उपयोग विशद केले तसेच ॐ कार, पुरक हालचाली, आसन व प्राणायाम प्रात्यक्षिकासह सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नाशिक ते पंढरपूर अशी ३०० सायकलीस्ट बरोबर वारी यशस्वी करणारे सायकलीस्ट अरूण पवार यांचा सत्कार करण्यात आला.

देवळा तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये यज्ञ उपक्रम रोटरी क्लब ऑफ देवळा व शिक्षण विभाग पंचायत समिती देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, प्रत्येक शाळेतील एक शिक्षक, शिक्षिका व पाच विद्यार्थी यांना आधी प्रशिक्षण देऊन वर्षभर दर शनिवारी किंवा आठवड्यातील कुठ्ल्याही एका दिवशी सदर उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती गट  शिक्षणाधिकारी प्राचार्य सतिश बच्छाव यांनी दिली.

कार्यक्रमास सर्व रोटेरीयन, विद्यानिकेतनचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सुनिल आहेर यांनी आभार मानले.


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!