कांदा चाळीत युरिया टाकल्याने २०० क्विंटल कांदा झाला खराब
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील लोहोणेर येथील पांडुरंग हरी वाघ या शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संबंधित शेतकऱ्याचा दोनशे क्विंटल कांदा खराब झाला असून आजच्या बाजार भावानुसार सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहोणेर येथील शेतकरी पांडुरंग हरी वाघ यांनी त्यांच्या शेतातील गट नंबर ५३२/५ मध्ये असलेल्या कांदा चाळीत उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती. टप्या टप्याने कांदा विक्री करून आपल्या पदरात दोन पैसे येतील, म्हणजे आपला घरगाडा सुरळीत चालेल अशी स्वप्न पाहत असतांना सदर कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्याने चाळीतील सर्व कांद्याचे नुकसान केल्याची घटना आज गुरुवारी (दि.१८) रोजी उघडकीस आली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पांडुरंग वाघ यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली असून सदर समाजकंटकास शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.