विठ्ठलाच्या कृपाआशीर्वादाने बालाजी देवस्थानचा प्रश्न मार्गी
आमदार सरोज आहिरे यांचे सभामंडप भूमिपूजनप्रसंगी प्रतिपादन

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी १७ जुलै- विहितगावसह अन्य काही गावातील शेतकरी बांधवांचा बालाजी देवस्थानचा प्रश्न शासन दरबारी मार्गी लावताना आपल्याला प्रति पंढरपूरातील या विठ्ठलाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याची भावना नेहमीच आपल्या मनामध्ये राहिलेली आहे. म्हणूनच आज या मंदिराच्या सभामंडपचे भूमिपूजन करताना विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार सरोज आहिरे यांनी केले.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मतदारसंघातील विहितगांव येथील श्री विठ्ठल मंदिर येथे सभामंडप व संरक्षण भिंत बांधणे या ७० लक्ष रू.किमतीच्या कामाचे विविध मान्यवरांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी निवृत्ती अरिंगळे,मनोहर कोरडे,विक्रम कोठुळे, दिलीप कोठुळे, गणेश खर्जुल,संजय हांडोरे, बाळासाहेब कोठुळे ,शिवाजी हांडोरे,पप्पू ठाकरे, गणपत कोठुळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर डाॅ प्रविण वाघ व आमदार सरोज आहिरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत कुदळी मारण्यात आली.
