भैरवनाथ महाविद्यालयची डोळचे पारणं फेडणारी वारकरी दिंडी !!!
शहा गावाला केले शाळकरी मुलांनी गावाला केले मंत्रमुग्ध ...
वेगवान नाशिक / wegwan Nashik
सिन्नर प्रतिनिधी / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर: दि. १६ जुलै २०२४ आनंदाचे डोही आनंद तरंग!
आषाढी एकादशीच्या पुर्व संध्याला श्री कालभैरवनाथ हायस्कूल च्या सर्व अबाल व सुदृढ विद्यार्थी व शिक्षक.पालक यांनी हायस्कूल येथुन विविध पोषाख परिधान करून गावातील सर्व गल्ली ते कालभैरवनाथ मंदिरापर्यंत आणि तेथुन पुर्ण रस्त्यावर पायी दिंडी काढण्यात आली.व गावाला मंत्रमुग्ध केले.
सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी,व विद्यार्थ्यांनी भैरवनाथ मंदिर परिसरातील प्रांगणात भव्य दिव्य असं गोल रिंगण करून एक आगळा वेगळा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन गावचे उपसरपंच श्री गणेश सुभाष बुब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माजी सरपंच गणेश जाधव , मुख्याध्यापक श्री काणसकर सर सर्व शिक्षक गावातील भाविक महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत या पालखी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले, या पालखी व दिंडी सोहळ्यात जवळ पास पाचशे विद्यार्थ्यांनी विविध पोषाख परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते. यात काही मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन एक आकर्षक आदा सादर केली.
टाळ मृदंग वीणा घेऊन तर अनेक मुलांनी लेझीम नृत्य सादर केले . त्यामुळे गावात एक भक्तीमय वातावरणात पहावयास मिळाले ” ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही ” असा साक्षात अनुभवाला, गावात ठिकठिकाणी पालखी स्वागत करुन पुजन करण्यात आले.
***** !! पाऊले चालती पंढरीची वारी…. *****
माध्यमिक लोक शिक्षण मंडळांचे अध्यक्ष श्री आण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष श्री दौलतराव मोगल, संचालक विजय गडाख, व्यवस्थापक आदी मान्यवरांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि खासकरून संपूर्ण लहान – मोठ्या मुलामुलींचे कौतुक केले व अभिनंदन केले. या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील श्री, डावरे सर. अमोल व्यवहारे सर. श्री, विष्णू ठोक साहेब. श्री, रौधंळ सर.श्री, दत्तात्रय आदिक सर.रामचंद्र थोरात सर ,प्रा.सचिन रानाडे .मालपाणी सर, सौ.अलका कोतवाल मैडम, क्लार्क जगन्नाथ शिंदे.मदतणीस सुनील तासकर.व इतर सर्व च शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोलाची कामगिरी बजावली. या सर्व दिंडी सोहळ्याचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.