बागलाण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांनी घेतलं ताब्यात
बागलाण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा सर्वांची पळापळ

वेगवान नाशिक / शशिकांत बिरारी
कंधाणे :विरगाव (ता.बागलाण) येथे छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या अनाधिकृत मटका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या विशेष पथकाने छापा टाकून एकाला ताब्यात घेऊन 2720 रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशाने नाशिक ग्रामीणच्या विशेष पथकाने गोपनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारावर आयुष्यमान आरोग्य केंद्र समोर असलेल्या घराचे पत्राचे आडोश्याला विरगाव (बागलाण)येथे दुपारी 1:55 वाजेच्या सुमारास मटका, कल्याण ,जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे लावून मिलन, कल्याण ,मटका नावाच्या जुगार खेळ खेळवत असतानाच बाळकृष्ण नारायण मांडवडे(40) राहणार (विरगाव ता.बागलाण, जि.नाशिक) याला पथकाने ताब्यात घेतले आहे.
त्याच्या कडून मटका जुगार खेळण्याचे साहीत्यासह 2720 रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यावर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…. वरिष्ठ स्तरांवरुन सलग दुसरी कार्यवाही..
सटाणा पोलिस स्टेशनपासून हाक्केच्या अंतरावर असलेल्या विरगाव येथे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून कार्यवाही केली आहे.याआधी चार दिवसांपूर्वीच (दि.12 शुक्रवारी) पठावे दिगर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाकडून मटका अड्ड्यावर कार्यवाही करण्यात आली होती.वरिष्ठांन कडून धडक कारवाईचे सत्र सुरू असतांना स्थानिक पोलीस प्रशासन नेमकं करतं तरी काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जावू लागला आहे.
या कार्यवाही नंतर तरी झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधित स्थानिक कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला गेला नाही? तर बागलाण तालूका अवैध धंद्याचे माहेर घर बनण्यास वेळ लागणार नाही.या कार्यवाही नंतर तरी अवैध धंद्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल का? हे पाहाणे आता औचित्याचे ठरणार आहे.
