मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बागलाणच्या या दाम्पत्यास मिळाला विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान
वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी १७ जुलै २०२४
सटाणा:
आज पहाटे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत बागलाण तालुक्यातील अंबासन येथील रहिवासी असलेले आहिरे कुटुंबीय यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. तालुक्याला प्रथमच हा मान आहिरे कुटुंबीयाच्या रूपाने मिळाला आहे.यामुळे आहिरे कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर विठुराया प्रसन्न होऊन वारी सत्कारणी लागण्याची भावना निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षांपासून बागलाण तालुक्यातील अंबासन येथील रहिवासी बाळू शंकर आहिरे(५५), त्याची पत्नी आशाबाई बाळूआहिरे (५०) हे आपल्या संपूर्ण कुुंटुबासमवेत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात तिथे कितीही गर्दीचा महापूर असला तरी ते कधीही गर्दी असली तरी मुखदर्शन घेऊन आपल्या घरी परतले नाही व त्यांनी यावेळी वारीला जायचं निर्णय घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. ते मागील १६वर्षांपासून वारी करीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत शासकीय महापूजेचा मान मिळाल्याने साक्षात विठ्ठलाने आपल्याला चमत्कार घडवला आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या महापूजेत आपला सहभाग नोंदवला.यावेळी त्यांच्या सोबत आई वडील व भाऊ पूर्ण परिवार उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला व एसटी महामंडळाकडून एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मानाचे वारकरी असलेल्या आहिरे कुटुंबीयांना देण्यात आला.