अतिरिक्त रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत होणार-मंत्री छगन भुजबळ
अतिरिक्त रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत होणार-मंत्री छगन भुजबळ

वेगवान नाशिक //एकनाथ भालेराव
येवला दिनांक 16 जुलै2024= गावागावात विजेचा वापर वाढला आहे. वेळोवेळी खंडीत होणार वीजपुरवठा हा बसविण्यात येणाऱ्या अतिरिक्त रोहित्रांच्या सहाय्याने कमी होवून शेतकरी व ग्राहकांना दिवसाही अखंड वीज मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज निफाड तालुक्यातील खडक माळेगाव व येवला तालुक्यातील मरळगोई येथे विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र बसविणे या कामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यकारी अभियंता के व्ही काळूमाळी, लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, दत्तात्रय रायते, डॉ.श्रीकांत आवारे, शेखर होळकर, मंगेश गवळी, दत्तात्रय डुकरे, सरपंच जगदीश पवार, अशोक नागरे, उत्तम नागरे, तानाजी आंधळे, तुकाराम गांगुर्डे, बाळासाहेब रायते, राहुल डुंबरे, निवृत्ती रायते, बबन शिंदे, पोलीस पाटील वैशाली नाजारे, खडक माळेगाव सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आज मंत्री छगन भुजबळ यांच्या निफाड तालुक्यातील विद्युत उपकेंद्रात ५ एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र बसवणे या कामाचे भूमिपूजन (र.रु.१५० लक्ष) व येवला तालुक्यातील मरळगोई येथीन ३३/११ विद्युत उपकेंद्रात ५ एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र बसवणे या कामाचे भूमिपूजन (र.रु.१५० लक्ष) संपन्न झाले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, वीज व पाणी ही मुलभूत गरज आहे. अतिरिक्त बसविण्यात येणाऱ्या रोहित्रांचा फायदा सारोळा, वनसगाव, ब्राम्हणगाव, खानगाव नजिक, पाचोरा खुर्द, पाचोरा बु., मरळगोई खु., महळगोई बु., गोंदगाव, शिवापूर या गावांना होणार आहे. हि प्रस्तावित कामे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. शासनाने आता शेतकऱ्यांसाठी मोफत वीजेची सवलत लागू केली आहे. त्याचप्रमाणे मागेल त्याला सौरपंप ही योजना सुरू केली असून प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी गावकऱ्यांना केले.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ प्रत्येक कुटूंबातील दोन स्त्रियांना होणार आहे. या योजनेचे फॉर्म १५ ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे व ऑगस्ट मध्ये फॉर्म भरणाऱ्या भगिनींनाही जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येकी रूपये १ हजार ५०० याप्रमाणे रूपये ३ हजार खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी माता व भगिनींना सर्वोतोपरी प्रशासनाने सहाकार्य करावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. विद्यार्थी युवकांना शासनाने कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रति महिना रूपये १० हजार स्टायपेंड मिळणार आहे. मुलींनाही यापुढे शिक्षण मोफत मिळणार आहे तसेच मुलींसाठी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून ती १८ वर्षे वयाची होईपर्यंत १ लाख ५ हजार तिच्या खात्यावर शासनाकडून जमा केले जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने तीर्थाटन योजना लागू केली आहे व त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यामुळे शासन निर्णयात नमूद केलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची संधी ज्येष्ठांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
*प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत मंत्री छगन भुजबळ यांचे यंत्रणांना निर्देश*
प्रस्तावित व भूमीपूजन झालेली कामे ही तातडीने व जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणांना दिले. आज निफाड तालुक्यातील पाचोरे बु.येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
*खालील कामाचे भूमीपूजन*
१. लौकि शिवापुर पाचोरे बु’ निमगाव वाकडा रस्त्याचे भूमिपूजन
२. वसंतराव नाईक तांडा वस्ती योजने अंतर्गत विविध रस्ते भूमीपूजन
३. ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत रु. १० लाख सभामंडप एकलव्य नगर.
४. सामाजिक न्याय विभागा अंतर्गत रु. १० लाख गाव अंतर्गत रस्ता क्राँक्रीटीकरण.
५. १५ वित्त आयोग. प्राथमिक शाळा स्वच्छतागृह रु ३ लाख. आणि
आमदार विकास निधी, १५१५ योजना शाळा कंपाउंड
६. १५ वित्त आयोग. पाणी शुद्धीकरण यंत्रणा आर.ओ. प्रोजेक्ट
*खालील कामाचा आढावा*
१. जलजीवन मिशन योजने अंतर्गत चालू असलेली पाणीपुरवठा योजना आढावा.
२. एकत्रित ३ सभामंडप चालू असलेल्या कामाचा आढावा.
३. शिवापूर येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना कामाचा आढावा.
*खालील कामाचे लोकार्पण*
१. १५ वित्त आयोग अंतर्गत रू. ४ लक्ष दफनभूमी रस्ता कॉक्रेटीकरण लोकार्पण
२. दलित वस्ती योजनेअंतर्गत स्ट्रीटी शाईट लोकार्पण.
३. १५ वित्त आयोग स्वच्छतागृह लोकार्पण
४. खासदार निधीतून काम झालेल्या दफनभूमी कंपाऊंडचे लोकार्पण.
५. पाचोरे बुद्रुक – मरळगोई रस्ता लोकार्पण.
६. पाचोरे बुद्रुक येथील गटार योजना लोकार्पण.
७. शिवापुर येथील सभामंडप लोकार्पण.
८. शिवापुर येथील ठक्कर बाप्पा योजनेतील सभामंडप लोकार्पण.
९. शिवापुर येथील स्मशानभूमी कामाचे लोकार्पण

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये