वेगवान नाशिक / wegwan Nashik
वेगवान सिन्नर – भाऊसाहेब र हांडोरे
सिन्नर ( प्रतिनिधी ) दि.१५ जुलै २०२४ सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेची सर्वत्र आँनलाईन अर्ज भरण्याची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकरी पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पिक विमा भरण्यासाठी अडचण येत आहे त्यामुळे शेतकरी पिक विमा योजना मुदत दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
खरीप २०२४ मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर www.pmfby.Gov.in थेट आँनलाईन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जुन २०२४ पासुन सुरु केले होती व भाग घेण्याचा अंतिम तारीख १५ जुलै २०२४ होती.
दिनांक १५ जुलै २०२४ सकाळी दहा वाजता पर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी छत्तीस लाख विमा अर्जाद्वारे साधारण नव्वद लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते राज्यात सरासरी खरीप हंगामात पेरणी क्षेत्र १४२ लाख हे आहे.गतवर्षी म्हणजे च खरीप २०२३ मध्ये पिक विमा अर्ज संख्या एक कोटी सत्तर लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र एक कोटी तेरा लाख हे आहे.
….** योजना सुरु परंतु आँनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे ,. डाटा लोड जास्त असल्याने कामाला उशीर ….**
राज्यात या योजनेअंतर्गत ९५ टक्के पेक्षा जास्त विमा अर्ज हे सामुहिक सुविधा केंद्र ( कॉमन सर्व्हिस सेंटर ) यांच्या माध्यमातून भरण्यात येतात.ग्रामिण भागातील इंटरनेट सुविधा कमी असणे किंवा त्याचा कमी असते . त्याचबरोबर शासनाने नवीन सुरू केलेली ” लाडकी बहिण” या योजनेअंतर्गत अर्ज देखील सामुहिक सुविधा केंद्र हे काॅमन सर्व्हिस सेंटर यांच्या माध्यमातून भरण्यात येतात.
अशाप्रकारे पिक विमा व लाडकी बहिण असे दोन्ही अर्ज काॅमन सर्व्हिस सेंटर च्या भरवयाचे असल्याने त्या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पिक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व शेतकर्यांनी आपल्या पिकांची विमा संरक्षित करुन घ्यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयांत पिक विमा योजना देऊ केली होती.
मात्र वरील समस्यांमुळे जे शेतकरी पिक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत . त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता यावा.या हेतुने राज्य सरकारने दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. सदर प्रस्तावास केंद्र सरकारने अनुमती देऊन आता. पिक विमा योजनेअंतर्गत भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ असा केला आहे.राज्यातील सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.<img src="https://wegwannashik.com/wp-content