वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील खामखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रभाकर शेवाळे तर व्हा. चेअरमनपदी सुनंदा शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नाशिक ग्रुप Whatsapp Group | Join |
खामखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश शेवाळे आणि व्हा. चेअरमन उत्तम पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी देवळा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ज्ञानेश्वरी आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती, त्यात चेअरमनपदासाठी प्रभाकर यादव शेवाळे आणि व्हा. चेअरमन पदासाठी सूनंदा हिरामण शेवाळे यांचा निर्धारित वेळेत प्रत्येकी एक- एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वरी आहीरे यांनी प्रभाकर शेवाळे यांची चेअरमनपदी तर व्हा चेअरमनपदी सुनंदा शेवाळे, यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, सरपंच वैभव पवार, माजी चेअरमन सुनील शेवाळे, समाधान आहेर, मुकुंद बोरसे, संजय मोरे, अनुप शेवाळे, विश्वास शेवाळे, गणेश शेवाळे, दिपक मोरे, संचालक प्रशांत शेवाळे, साहेबराव शेवाळे, नामदेव बच्छाव, विजय सुर्यवंशी, सतीश शेवाळे, विजय शेवाळे, सुनील बोरसे, दत्तू मोरे, उत्तम पवार, गणेश शेवाळे, हिरामण मोरे, निवृती बिरारी, लताबाई शेवाळे, सोसायटीचे सचिव कैलास बच्छाव, कडू शेवाळे, सभासद, व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.