नाशिक ग्रामीण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबाजावणी करावी -मंत्री छगन भुजबळ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबाजावणी करावी -मंत्री छगन भुजबळ


वेगवान नाशिक //एकनाथ भालेराव

येवला दि. 16 जुलै 2024:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात प्रभावी अंमलबजाणी करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. आज येवला येथे आयोजित विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बैठकीस प्रांताधिकारी येवला बााबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे,येवला नगरपरिषदचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक कार्यकारी अभियंता के.के आव्हाड, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आज मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही ग्रामपातळीवरही राबविण्याच्या दृष्टीने याचा लाभ सर्व माता व भगिनींपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व प्रशासनाने सर्वोतोपरी सहाय्य करावयाचे आहे. या योजनेच्या लाभातून एकही महिला वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावयाची आहे. शहरासोबतच गावागातही शेतमजूर महिला, कष्ठकरी महिलांचे या योजनेसाठी फॉर्म भरून घ्यावयाचे आहेत. यात कसूर होता कामा नये असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, रास्तभावाच्या दुकानात वितरीत होणाऱ्या अन्नधान्यापासून कोणीही वंचित राहू यासाठी शिधापत्रिकाधारकांना वेळेत याचा लाभ देण्याची दक्षता घेण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचीही अंमलबजाणी करण्यात यावी. टंचाईचा आढावा घेतांना मंत्री छगन भुजबळ यांनी ज्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी टँकर्सची सूरू ठेवावे. राजापूर व ४० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा कामाची सद्यस्थिचा आढावा मंत्री भुजबळ यांनी यावेळी घेतला. त्याचप्रमाणे धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती व उर्वरित कामे त्वरेने पूर्ण करण्याच्यण सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. खरीप हंमागामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना रासायनिक खते व आवश्यक बी बियाण्यांची उपलब्धता वेळेत करून देणेबाबत सूचना दिल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतांना जिल्हा मध्यवती बँकेकडून आतापर्यंत ४७ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे १३७ कोटी वितरित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यासोबतच मंत्री छगन भुजबळ यांनी पी. एम. किसान योजना, पूणेगांव दरसवाडी डावा कालवा व दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालवा कामे, ल.पा. तलाव महालखेडा, ममदापूर व देवना ता.येवला आणि ल.पा. तलाव सावरगांव ता. निफाड कामे, लासलगाव बाह्यवळण रस्ता कामे, महावितरणकडील समस्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा घेतला.

आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप

वर्षानुवर्ष रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना रेशन कार्ड तातडीने उपलब्ध करून द्यावे यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले होते. यासाठी येवला संपर्क कार्यालयात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आदिवासी बांधवांची कागदपत्रे जमा करून त्यांना तात्काळ रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना यातील काही लाभार्थी आदिवासी बांधवांना त्यांच्या हस्ते रेशन कार्डचे वितरण करण्यात आले.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!