मुख्यमंत्री साहेब बहिण लाडकी झाली पण् दाजीच काय
मुख्यमंत्री साहेब बहिण लाडकी झाली पण् दाजीच काय

वेगवान नाशिक //एकनाथ भालेराव
येवला दिनांक 16जुलै 2024/-राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक गमतीजमती सांगणाऱ्या मिम्सचा, विडीओ सह मेसेज चा महापूर आला आहे.
मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण झाली पण् दाजींच काय असे म्हणत पुरुषांची लाडका दाजी योजनेची जोरदार मागणींचा गमतीजमतीचा सोशल मीडियावर जोर वाढला आहेत.
तसेच जाचक अटीमुळे लाडकी बहीण सावत्र वाटत असल्याची भावना. लाडका दाजी लाडका जावई योजना लाडका भाऊ योजनेच्या मागण्या करणाऱ्या गंमतीदार मिम्स मनोरंजक ठरले आहेत.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर या योजनेचे सर्वाधिक मिम्स, विडीओ सह मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत.
सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिसाद मिळवणारी ही शासकीय योजना ठरली आहे. एरवी शासकीय योजनांची माहिती सोशल मिडियावर फारशी चर्चेला येत नाही. पण या योजनेच्या बाबतीत अगदी उलटे झाले आहे.
पुरुष मंडळीकडून महिलांच्या नावाने योजना सुरु होत असल्याने अगदी जळफळाट व्यक्त करणारे मिम्स पाहण्यास मिळत आहेत. लाडका दाजी योजना का नाही अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
लाडका दाजी बेकार आहे त्यांनाही काही पैसे द्यावेत लाडका दाजी कागदपत्रांसाठी हैराण असे संदेश दिसतात. लग्नाआधीचा एकटा भाऊ बेरोजगार आहे. त्यांची योजनेची मागणी हास्याच्या फवाऱ्यात केली जात आहे.वाचकांनी हसता हसता पुरेवाट होऊ लागली आहे.
घरात महिलांशी पुरुषांनी सन्मानाने वागावे. कारण आता त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण झाल्या आहेत असा ही संदेश दिसू लागला आहे.महिला लाभार्थीच्या संदर्भात तर अगदी तुफानी मिम्स सुरू आहेत.
योजनेच्या जाचक अटीमुळे लाडकी बहीण ऐवजी सावत्र बहीण योजना असे नाव ठेवावे हा मीम्स आला. नंतर लगेच जाचक अटी शिथिल झाल्याने पुन्हा सावत्र ऐवजी बहीण लाडकी वाटू लागली असेही मेसेज आले तसेच काही महिलांनी एसटी मोफत प्रवास करण्यासाठी आधार कार्ड वर वय वाढवून घेतल्याने आता या बहिणीला योजना मिळणार नाही असाही मिम्स आला आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये