नाशिकचे राजकारण

विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेचा भगवा फडकवू -आमदार किशोर दराडे… येवल्यात शिवसेना शिंदे गटाची महत्वपूर्ण बैठक

विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेचा भगवा फडकवू -आमदार किशोर दराडे... येवल्यात शिवसेना शिंदे गटाची महत्वपूर्ण बैठक


वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला दिनांक . १५जुलै 2024
नुकत्याच शिक्षक मतदार संघाची निवडणूक झाली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील आमदार किशोर दराडे यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करून तब्बल दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले यामुळे तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील आमदार दराडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे विधानसभा प्रमुख किशोर सोनवणे शहर प्रमुख अतुल घटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक तसेच तालुक्यातील महत्त्वाचे राहिलेली रिक्त पदे तातडीने पूर्ण करा प्रत्येक गटामध्ये गणामध्ये शहरातील प्रत्येक वार्डमध्ये शिवसेनेची ताकद वाढवा अश्या सूचना आमदार किशोर दराडे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी तालुक्यामध्ये तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ताकतीने कामाला लागा तालुक्यात कुठल्याही कामाची अडचण पडल्यास थेट आमदार किशोर दराडे यांची संपर्क साधा असे असे आमदार दराडे यांनी सांगितले येणाऱ्या विधानसभेमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वांनीच ताकतीने कामाला लागावे असे त्यांच्या भाषणातून सांगितले तर तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी पक्षाच्या वतीने सर्वप्रथम नुकतीच आमदार पदी निवड झाल्यामुळे अभिनंदनाचा ठराव केला. सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार किशोर दराडे यांचा सत्कार केला तसेच तालुक्यामध्ये सध्या स्थिती पक्षाची परिस्थिती काय आहे.यावर सविस्तर मांडणी केली आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा आमदार किशोर दराडे यांच्या समोर ठेवला उर्वरित संघटनेला मजबूत करण्यासाठी तुमच्यासारखा आश्वासन चेहरा मिळाल्याचे देखील शेळके यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्ट केले.यामुळे पुढच्या काळामध्ये पक्ष वाढवण्यासाठी आपल्यासारख्या आमदाराची भर पडली त्यामुळे निश्चितपणाने पक्ष मोठी भरारी घेईल असा विश्वास पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला. तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात वेळ द्या असे किशोर सोनवणे यांनी सांगितले.या बैठकीचे आभार प्राध्यापक अंकुश निकम यांनी मानले. या बैठकीस आमदार किशोर दराडे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील, उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे, विधानसभा प्रमुख किशोर सोनवणे,तालुका समन्वयक अंकुशराव निकम,शहर प्रमुख अतुल गटे,संतोष वल्टे,रावसाहेब पारखे,योगेश ठाकरे,नवनाथ पोटे,बिपिन लासुरे,गणेश सोनवणे,प्रतीक राऊळ गोकुळ ठुबे,राजेंद्र मेढे अर्चना शिंदे पुनम वडे,सुनिता लहरे,दिपाली नागपुरे यांच्यासह आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी:- बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे शिक्षक आमदार किशोर दराडे शेजारी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील,अमोल सोनवणे किशोर,अमोल सोनवणे व आदी पदाधिकारी.

दुसऱ्या छायाचित्रात शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांचा सत्कार करताना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील,अमोल सोनवणे, किशोर सोनवणे व आधी पदाधिकारी.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!