वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.15 जून-
मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्रोही साहित्य चळवळीतील लढवय्या कवी यशवंत बागुल यांचा विवेकानंदनगर नंबर 2 येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दलित चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्रोही साहित्य चळवळीतील एक लढवय्या याच्या आकस्मित मृत्यूमुळे मनमाड शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनमाड शहर पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…