नांदूर शिंगोटे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्रीत चार दुकाने फोडली दोन दुकानात चोरीचा प्रयत्न असफल
वेगवान नाशिक / प्रकाश शेळके
सिन्नर प्रतिनिधी दिनांक 15 सोमवार –नांदुर-शिंगोटे परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी डिझेल चोरीच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी रात्री तीन ते तीन तीस दरम्यान भर बाजारपेठेमध्ये तीन सोनारांची दुकाने लक्ष बनविली मात्र सुदैवाने त्यातील दोन दुकाने शटर तोडण्यास चोरटे यशस्वी झाले तर एका दुकानाचे शटर तोडून किरकोळ म** लंपास तर एक किराणा दुकान फोडून सहा ते सात हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे असाल झाल्याची घटना घडली
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदुर-शिंगोटे येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलामध्ये सोनरांची दुकाने असून या ठिकाणी अंबिका ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सीसीटीव्ही झाला. अंबिका ज्वेलर्सचे संचालक सुबोध माळवे यांचे दुकान फोडण्यात चोटे यशस्वी झाले तर त्याला लागूनच असलेले साई ज्वेलर्स जितेश माळवे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यातही चोरटे अयशस्वी झाल्याचे प्रत्यक्ष सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून सदरच्या सीसीटीव्ही मध्ये तीन चोरटे दिसत असून यामध्ये एकाच्या हातामध्ये काहीतरी गोणी दुसऱ्याच्या हातात कटावणी इतर तिसऱ्याच्या हातामध्ये गलोवर दिसून आली यामध्ये या ठिकाणी चोरटे ऐसे स्वी झाल्यानंतर नजदीकच असलेल्या ए बी ज्वेलर्स बाळासाहेब माळवे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यात चोटे यशस्वी झाले.
मात्र या दुकानात किरकोळ वस्तू वगळता काही त्यांच्या हाती लागले नाही तर त्यानंतर त्यांनी मारुती मंदिरालगत असलेल्या दिलीप पठारे यांच्या दर्शन किराणाया दुकानाचे शटर कटावणीने तोडून दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम सहा ते सात हजार चोरून नेण्यात ते यशस्वी झाले तर जाताना त्यांनी दुकानातील इतर वस्तूंची उलथा पालत केली साधारणता रात्री तीन वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला दर्शन किराणाचे मालक दिलीप पठारे यांचे बंधू अनिल पठारे हे नजदीकच राहत असून ते मुंबई येथे सकाळी जाणार असल्याकारणाने लवकर उठले असताना ते बाहेर आले तर दुकानाच्या ओट्यावर तीन चोरटे गप्पा मारताना त्यांना आढळून आले त्यांची येण्याची चाहूल लागताच तिघांनी बॉक्सर मोटरसायकल वरून पलायन केल्याचे निदर्शनास आले मात्र पठारे घाबरल्यामुळे ते मागे पळाले मात्र तोपर्यंत चोरटे तेथून प्रसार झाले त्यानंतर त्यांनीआरडा ओरड करून सर्वांना जागे केले.
सदरच्या चोट्यांना एवढे मोठी दुकाने फोडूनही काही जास्त घबाड हाती लागले नाही हे उघड झाले असून नांदूर शिंगोटे मध्ये एकाच रात्रीत चार ते पाच चोरी सत्रामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत पोलिसांना खबर देण्यात आले असून श्रीसर पंचनामा करण्याचे काम सुरू होते नांदुर-शिंगोटे येथे पुन्हा चोरी सत्राला सुरुवात झाली असून रात्रीच्या वेळीस पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे
प्रकाश शेळके गेल्या 20 वर्षापासून मिडीया क्षेत्रात कार्यरत आहे. सिन्नर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बातम्यांची जाण आहे. सध्या वेगवान मिडीयामध्ये वेगवान नाशिक व वेगवान मराठीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.