सतीश बागुल बेपत्ता, नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव दि.14 जुलै 2024 रविवार प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतीश सुरेश बागुल वय वर्ष 25 हा बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी नांदगाव येथील बेपत्ता झाला असून याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मोठा मुलगा सतीश सुरेश बागुल वय वर्ष 25 याचा विवाह एक वर्षांपूर्वी झाला असून निफाड तालुक्यातील रामाचे पिपळस येथील त्याची सासूवाडी आहे.तो दिनांक 10 जुलै 2024 रोजी बुधवारी त्याचे आई-वडील रोहिले बुद्रुक येथे राहतात. सतीश बागुल हा रोहिले बुद्रुक येथून नांदगावला काही कामासाठी जातो म्हणून घरातून निघून गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्याचा नातेवाईकाकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
सतीश सुरेश बागुल हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे वडील सुरेश भास्कर बागुल यांनी 14 जुलै 2024 रोजी रविवारी नांदगाव पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीवर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करून घेण्यात आली असून या सदर गुन्ह्याचा तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर बस्ते हे करत आहेत.
