केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पॅंथरची नांदगावला डरकाळी
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पॅंथरची नांदगावला डरकाळी
वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दि.13 जुलै 2024 शनिवार प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे नांदगाव येथे केंद्रीय मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले हे तिसऱ्यांदा मंत्रीपदावर विराजमान झाल्याच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या आदेशाने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालय नांदगाव शहर येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाईवाटप व सामाजिक चळवळीतील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पवार, भारतीय जनता पार्टीचे व्यापारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तराज छाजेड, शिवसेना माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, शिवसेना माजी शहरप्रमुख भारतभाऊ मोकळ, कामगार नेते वामनदादा पोतदार, भारतीय जनता पार्टीचे नेते राजाभाऊ गांगुर्डे, एडवोकेट सचिन साळवे, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष श्रावण पवार, तालुका उपाध्यक्ष वाल्मीक सादवे, तालुका कार्याध्यक्ष रमेश निकम, गणेशभाऊ शर्मा, एडवोकेट उमेश सरोदे, कुलकर्णी आदी उपस्थित होते
नांदगाव तालुक्यातील संपादक भगवान सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, पत्रकार अभिषेक विघे, शिवकन्या संगीताताई सोनवणे, अखिल भारतीय होलार समाज जिल्हाध्यक्ष रेखाताई शेलार, सामाजिक कार्यकर्ते ताराबाई शर्मा, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पवार आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप मोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका संपर्कप्रमुख अमोल बेडगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धनगर तालुकाध्यक्ष देवराम जाधव, होलार आघाडी तालुकाध्यक्ष अर्जुन यमगार, तालुका संपर्कप्रमुख कडू केळकर
गोकुळ निकम, युवा तालुका उपाध्यक्ष संजय मोरे, युवा तालुका कार्याध्यक्ष अरुण सोनवणे, तालुका आदिवासी आघाडी उपाध्यक्ष संदीप बिन्नर, धनगर आघाडी तालुका उपाध्यक्ष राहुल फटांगरे, आदी कार्यकर्त्यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.