मांडवड; ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाणांना अपहार प्रकरणी निलंबित

वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दि.12 जुलै 2024 शुक्रवार प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अप्रतफळ करून 3,57,750/- रुपयांची अपहर केल्याप्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तु चव्हाण यांच्यावर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
नांदगाव तालुक्यातील नोव्हेंबर 2023 या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले . त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनातर्फे त्यांना ठराविक अनुदान मदत म्हणून दिले होते. नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष पतु चव्हाण यांनी 13 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात अनेक शेतकऱ्यांचा निधी आपल्या स्वतःच्या नावे वेळोवेळी जमा केले.
ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी गारपीट अनुदान स्वतःच्या नावे व नातेवाईक आणि इतरांच्या नावे वर्ग केले होते. त्यामुळे मांडवड येथील शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय दळवी यांनी नांदगाव तहसील कार्यालय यांना पत्र पाठवले होते.
त्या अनुषंगाने नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी समिती स्थापन करून चौकशीची अहवाल मागविला होता. सदर चौकशीच्या अहवालामध्ये ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण व इतर दोषी आढळल्याने चव्हाण यांच्यासह अकरा जनावर नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी अपहर केल्याचे सिद्ध झाल्याने नांदगाव पंच समितीची गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चव्हाण यांना बडतर्फ (विनंती) करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावावरून शहानिशा करून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना निलंबित केली असून तसा आदेश काढण्यात आल्याचे मित्तल यांनी सांगितले.
