
वेगवान नाशिक : विशेष प्रतिनिधी दि.१२ जुलै
दळणवळणासाठी त्रासदायक ठरत असलेल्या देवळाली कॅम्प-भगूर-पांढुर्ली दरम्यान रस्त्याचाही प्रश्न मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी मार्गी लावला आहे.
आ. सरोज आहिरे यांनी रस्त्यासाठी निधीची मागणी करताच शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला. दरम्यान लवकरच रस्त्याच्या कामाला सुरवात होणार असून यामुळे 52 खेड्यातील नागरिकांची सोय होणार आहे.
आ. आहिरे यांनी पावसाळी अधिवेशनात तब्बल पावने तिनशे कोटी मंजूर करुन घेतल्याने मतदारसंघात विकासकामांची गंगा वाहणार आहे. मात्र देवळाली कॅम्प भगूर-पाढुर्ली रस्ताची परिस्थिती खूपच दयनीय झाल्याचे चित्र होते. कारण गेल्या बारा वर्षापासून रस्त्याचे रखडलेले काम होऊ शकलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेषत: पावसाळ्यात रस्त्यावरुन वाट काढणे जिकीरीचे झाले होते. यापूर्वी आ. आहिरे यांनी या रस्त्यासाठी १ कोटी रुपये मंजूर करून त्यात देवी मंदिर समोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यासाठी प्रयत्न केले असता, या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १.१७ कोटी मंजूर असून रस्त्याचे काम रखडले होते. मात्र यामुळे वाहनधारक व नागरिकांचेे होणार हाल होत होते. अखेर याप्रकरणी विधीमंडळात आ. आहिरे यांनी रस्त्यासाठी तात्काळ निधीची मागणी केली. व शासनाने पाच कोटीचा निधी मंजुर केला. विधानसभेचे शेवटचे अधिवेशन शुक्रवारी संपुष्टात आले. या अधिवेशानातून देवळाली मतदारसंघासाठी भरघोस निधी प्राप्त झाल्याने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला दहावा मैल ते सिद्धीपिंपी-लाखलगांव-हिंगणवेढे-कोटमगांव-जाखोरी-शिंदे येथील राज्य महामार्गाला जोडणारा असा कनेक्टीव्हिटी मार्ग होत आहे. यासाठी शासनाने 174 कोटी मंजूर केले आहेत. देवळाली कॅम्प-भगूर-पांढुर्ली या रस्त्याचा प्रश्न आ. सरोज आहिरे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार असल्याने 52 खेडयांतील नागरिकांचा प्रश्न मिटणार आहे.
कोट
भग रेस्ट कॅम्प रस्त्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित होती. या रस्त्याचे काम मार्गी लागल्याचा आनंद आहे ५ कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. – आमदार सरोज आहिरे
