माजी नगरसेवकाच्या पुत्रावर सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर जीव घेणे हल्ला
माजी नगरसेवकाच्या पुत्रावर सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर जीव घेणे हल्ला
वेगवान नाशिक/ :,नाशिक नितीन चव्हाण ता:,११ जून २०२४
नाशिक, ता. लेखानगर भागात उभ्या असलेल्या माजी नगरसेवकाचे पुत्र अजिंक्य चुंबळे तसेच गवळणीचे सरपंच अशी त्यांची ओळख आहे..अजिंक्य चुंबळे यांच्या हॉटेलला गेल्या दोन ते तीन दिवसापासून काही टवाळखोर धिंगाणा घालत असल्याची बातमी त्यांच्या कानावर गेली. त्यांनी समोरील टवाळखोरांना समज देण्याचा प्रयत्नही केला
मात्र अजिंक्य यांचा राग मनात धरत अजिंक्य चुंबळे हे नाश्ता करत असताना अचानक आठ ते दहा जण आले व त्यांनी अजिंक्य चुंबळे यांना धक्काबुक्की करत धारदार शस्त्र काढत त्यांना दमदाटी करत जॉब विचारण्याचा प्रयत्न केला असता अजिंक्य चुंबळे यांनी त्यांना समजावत काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु नशेत असलेल्या टवाळखोरांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न करताच अजिंक्य चुंबळे यांनी त्यांचा जीव वाचवत जागेवरून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात कळवले पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अद्याप पर्यंत कुठलाही गुन्हा दाखल नाही, चुंबळे यांचा संरक्षणासाठी नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित झाला. कुठलाही मोठा अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा पाऊस फाटा लेखा नगर या ठिकाणी जमला होता. पुढील तपास अंबड पोलीस करत आहे.