मोठ्या बातम्या

जिल्हा बँकेच्या शेतकर्याचं कर्ज माफ करा – माणिकराव कोकाटे

जिल्हा बँकेच्या शेतकर्याचं कर्ज माफ करा -माणिकराव कोकाटे


वेगवान नाशिक / wegwan Nashik

सिन्नर प्रतिनिधी: भाऊसाहेब र हांडोरे

नाशिक प्रतिनिधी/ सिन्नर,दि.१२ जुलै २०२४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जलसिंचन योजना चे शेतकऱ्यांचे
कर्ज माफ करा अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

गोदावरी उपसा जलसिंचन योजना, बारागाव पिंपरी कर्ज माफीबाबत आमदार माणिकरावजी कोकाटे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली व श्री कोकाटे यांनी तालुक्यातील काही कामेही मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला.

लक्षवेधीला नामदार वळसे पाटील यांनी उत्तर म्हटले आहे की सहकार विभागाने राज्यातील अडचणीतील अवसायनात आलेल्या व नोंदणी रद्द झालेल्या सहकारी जलसिंचन संस्थांचे कर्ज (मुद्दल) रक्कम माफ करण्याचा जो प्रस्ताव तयार केला आहे, त्या प्रस्तावामध्ये उपरोक्त संस्थेचा समावेश करण्यात येईल. सदर संस्थेच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम माफ करण्याबद्दल विचारणा केली असता सदर व्याजात सवलत देणेबाबत देखील सरकार सकारात्मक असल्याची माहिती देत त्यावर योग्य तो निर्णय होईल असे आश्वासन यावेळी नामदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

आज कॅबिनेटमध्ये शेतकरी लिफ्ट योजना तालुक्यातील अनेक योजना प्रहार जनशक्ती तर्फे पाठपुरावा तालुका अध्यक्ष कैलास दातीर अँड कार्याध्यक्ष विलास खैरनार महिला अध्यक्ष पुष्पा भोसले शेतकरी तालुकाध्यक्ष चंद्रकांत डावरे व कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराला यश येणार जय प्रहार सिन्नर दिव्यांगांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाऊसाहेब सांगळे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनावट कार्याध्यक्ष अँड प्रभारी कांचन भालेराव यांच्यासह अनेकांच्या पाठपुराव्याला यश येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!