चांदवड तालुक्यात रेल्वेतून तरुण पडला
वेगवान नाशिक
चांदवड, ता. 11 जुलै 2024 – तालुक्यातील रेल्वे हद्दीत गेट न.११२ रापली गेट परिसरात पुन्हा एकदा तरुण सचिन कैलास हजारे औरंगाबाद परीसरातील वेक्ती रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. मृतदेह चांदवड पोलीस स्टेशनची हवालदार कैलास पवार यांनी ॲम्बुलन्स मध्ये टाकून चांदवड शासकीय रुग्णालय नेण्यात आले.
परिसरात वारंवार रेल्वे दरवाजातून व्यक्ती पडून मृत्युमुखी पडत असल्याचे दिसून येते. सर्व रेल्वे आर पी एफ व रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. याला कारणीभूत प्रशासन आहे आणि सदर व्यक्तही.
कारण रेल्वेच्या एसी कोच वाढून जनरल व स्लीपर कोच कमी केल्याचे हे परिणाम आहे. कारण स्लीपर कोचचे हाल हे जनरल पेक्षा भयानक झाल्याचे निदर्शनास येते. त्यामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही. गर्दी मुळे आर पी एफ व टीसी सुद्धा बोगीत प्रवेश करायला तयार नसतो. याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.
कोणी दरवाजात बसेल असेल तर त्याच्यावरती रीतसर कारवाई करण्यात यावी अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते चांदवड तालुका प्रतिनिधी श्री भागवत झाली त्यांनी रेल्वे आरपीएफ यांना दिली