नाशिक ग्रामीणसरकारी माहिती

पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी

पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी


 

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला दि.१० जुलै :-राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रस्ते व पुलांसह महसूल अधिकारी निवासस्थानाच्या कामांचा समावेश आहे. या कामांना लवकरच सुरुवात होऊन मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

नाशिक मध्ये दिवसा ढवळ्या महिलेचा विळ्याने हल्ला करत केला खुन ( व्हिडीओ)

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग ०८ ते नांदेसर आडगाव चोथवा उंदीरवाडी बोकटे खामगाव ते प्रमुख राज्य मार्ग ०२ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ८० मध्ये सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख, अनकाई कुसमाडी नगरसूल अंदरसूल पिंपळगाव जलाल रोड राज्य महामार्ग ४५१ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लासलगाव पाटोदा रस्त्यावरील राज्य महामार्ग १४ वरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ५० लाख, गाजरवाडी ते नांदूरमध्यमेश्वर ग्रामीण महामार्ग १२३ या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी, वनसगाव थेटाळे कोटमगाव प्रमुख जिल्हा मार्ग १७४ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व सुधारणा करण्यासाठी ३ कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे.

येवला येथील महसुली अधिकारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी ५१ लाख

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता त्यांच्या प्रयत्नांतून पुन्हा महसुली अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या निवासस्थानांच्या कामास सुरुवात होऊन महसुली अधिकाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!