नाशिक ग्रामीण

निफाड भावकिच्या वादातून सख्या भावासह इतर लोकांना वृध्दास जीवंत पेटविले ( व्हिडीओ )


वेगवान नाशिक

निफाड, ता. 10 जुलै 2024-

निफाड तालुक्यातील थर्डी सारोळे येथे भावकीच्या वादातून सख्ख्या भावासह कुटुंबीयांनी ८० वर्षीय वृद्धावर डिझेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. यात ९५ टक्के भाजलेल्या वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. (old man was set on fire Incidents in Niphad Taluka)

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

वेगवान नाशिक. नाशिकरोडला सिटी लिंक बस खाली पाच वर्षाची चिमुकली ठार तर आजोबा जखमी..

माहितीनुसार, कचेश्वर महादू नागरे असे मृत वृद्धाचे नाव आहे. थडी सारोळे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून वाद असून, वयोवृद्ध कचेश्वर नागरे मंगळवारी (ता. ९) शेतातील घराजवळ होते, तर त्यांचे कुटुंबीय घरात होते.

सायकल स्वारी ! पंढरीची वारी !! ” नाशिक सह सिन्नर येथील शेकडो भाविक रवाना .. ..

ही संधी साधत डिझेलचे डबे घेऊन त्यांच्या धाकट्या भावासह भावजय व दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. काही समजण्याच्या आत घडलेल्या या घटनेनंतर कचेश्वर यांनी सैरावैरा पळत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

कचेश्‍वर यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीयाने घराबाहेर धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच संशयित नागरे कुटुंबीय पसार झाले होते.
या घटनेत कचेश्वर नागरे गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हालविले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!