सायकल स्वारी ! पंढरीची वारी !! ” नाशिक सह सिन्नर येथील शेकडो भाविक रवाना .. ..
सायकल स्वारी ! पंढरीची वारी !! " नाशिक सह सिन्नर येथील शेकडो भाविक रवाना ,,, ,,,
वेगवान नाशिक/wegwan Nashik
सिन्नर तालुका ( प्रतिनिधी ) भाऊसाहेब र हांडोरे
सिन्नर दि.१० जुलै २०१४ आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन माझ्या विठुरायाच्या पायावर टेकवूनीय माथा , यासाठी आख्खा महाराष्ट्र वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत आहे त्यानुसार यावेळी नाशिक मधुन सायकल वारी निघाली असुन तीनशे सायकल स्वार या वारीत सहभागी झाले असून त्यात चाळीस महिलांचा आणि एका दिव्यांगाचाही समावेश आहे.
नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना करण्यात आले.हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानं येथे ढोल ताशांच्या गजरात, माऊली व विठ्ठल नामाचा गजर व जयघोषात या वारीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशन च्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून सायकल वारीचे आयोजन करण्यात येते.तर सिन्नर मार्केट कमिटी चे संचालक व शिवतीर्थ दउधडएरईचए मालक श्री कृष्णा भाऊ घुमरे यांसह श्री घोटेकर भाऊ यांनीही पंढरपूर सायकल वारीत सहभागी झाले आहेत. आरोग्य व शक्ती लोभो या साठी जिल्हा परिषद सदस्य सिमिंतिनी कोकाटे यांनी भेट घेतली व सुखरूप प्रवासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले व शुभेच्छा देऊन रवाना केले. या सर्व सायकल स्वार भाविक भक्तांचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.