वेगवान नाशिक. नाशिकरोडला सिटी लिंक बस खाली पाच वर्षाची चिमुकली ठार तर आजोबा जखमी..
नाशिकरोड 10 जुलै 2024
नाशिकरोड येथील मालधक्का रोडच्या पाठीमागे व गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बस डेपोच्या आवारात सिटी लिंक बसणे जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षाची चिमुरडी ठार झाली असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने सिटी लिंक बस व्यवस्थापनाला धारेवर धरले अपघात करून बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलेलाआहे.
अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव सानवी सागर गवइ वय पाच वर्ष राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर रेल्वे माल धक्का नाशिकरोड अपघातात ठार झालेली सानवी इयत्ता पहिली मध्ये शिकत असून शाळेतून आजोबा सोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात MH 15 GV 7719 असा असून सदरच्या बसची धडक बसल्याने चिमुरडी जागीच ठार झाली.अपघातानंतर बस चालक हा तिथून फरार झाला आहे .
नागरिकांनी व कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून याप्रकरणी जाब विचारला सदरचा बस चालक कुठे फरार झाला व त्याला लपून ठेवले आहे की काय असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला दरम्यान यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.