
वेगवान नाशिक / wegwan NASHIK
नांदगाव ,दि.10 जुलै 2024 बुधवार प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील चिंच विहीर या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून या गावातील विक्रम दाणेकर या शेतकऱ्यावर दिनांक 10 जुलै 2024 रोजी बुधवारी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विक्रम देशमाने हे गंभीरित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.
चिंचविहीर या गावात बिबट्याचा संचार झाल्यामुळे येथील ग्रामस्थ व नागरिक भय भय झाले आहे. त्यामुळे नांदगाव वन विभागाने येथील बिबट्याला बंदोबस्त करून जेरबंद करून येथील नागरिकांचे जीव वाचविण्याची मागणी चिंचविहीर या गावातील नागरिक करत आहेत.
