नाशिक मध्ये दिवसा ढवळ्या महिलेचा विळ्याने हल्ला करत केला खुन ( व्हिडीओ)
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/07/महिला-नाशिक-खुन-780x470.webp)
वेगवान नाशिक
पंचवटी, ता. 10 जुलै 2024 – पंचवटी दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर परिसरातील वयोवृद्ध महिलेवर दिवसाढवळ्या अज्ञात हल्लेखोरांनी विळ्याच्या साहाय्याने हल्ला करत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील राधानंद निवास याठिकाणी राहणाऱ्या कुसुम सुरेश एकबोटे (वय ८० वर्षे) या ज्योती गोविंद एकबोटे या मुलीसोबत भाड्याने राहत असे. बुधवार (दि.१०) रोजी सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान सदर महिला घरात एकटी असताना अज्ञात हल्लेखोराने या वयोवृद्ध महिलेवर विळ्याच्या साहाय्याने डोक्यावर व छातीवर वार करत खून केल्याची घटना घडली आहे.
सदर मयत वृद्ध महिला सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास परिसरात घंटागाडी आली असता त्या महिलेने कचरा टाकण्यासाठी खाली आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नाशिक मध्ये दिवसा ढवळ्या म्हातारीचा खुन…
घटनास्थळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सपोनि. सत्यवान पवार, गुन्हे शोध पथक, पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचारी दाखल होत तपास करीत आहेत.
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)