वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव दि. 9 जुलै 2024 मंगळवार प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात सन 2021 / 22 मध्ये एक कार्यालय बांधण्यात आले होते त्याचे मोजमाप साधारणतः 15 फूट × 20 फूटाचे असून सदरचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले असून त्या कामासाठी 16 लाख रुपये इतके आहे.
सदरचे कार्यालयाचे बांधकाम हे व्हि.टी . परदेशी अँड सन्स यांनी केलेले आहे. सदर कामाचा स्लॅब हा मोठ्या प्रमाणात गळतो. सदरच्या उत्कृष्ट कामाची तात्काळ चौकशी व्हावी. शासकीय अंदाजपत्रकानुसार सदर कामाची निर्मिती करून घ्यावी व या कामाशी सलग्न असलेले ठेकेदार, सचिव व इतर तांत्रिक अधिकारी यांचे वर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
सन 2021 / 22 मध्ये कार कंपाऊंडचे काम करण्यात आले होते. ते काम देखील ही कृषी दर्जाचे काम झाले असून यामध्ये साधारणतः दोन वर्षांपर्वी झालेल्या कामाचे शासनाकडून कुठल्याही प्रकारचे निलिखित न करता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व ठेकेदार यांनी ते जमीनदस्त करून सध्या त्यावरती दुसरे वॉल कंपाऊंड चे काम केलेले आहे.
सन 2024 /, 25 मध्ये चालू असलेली धान्य निलाव शेडचे काम दिनांक 6 जुलै 2024 रोजी शुक्रवारी सायंकाळी जमीन दोस्त झाले आहे. तरी या कामाची चौकशी होऊन यामधील दोषवर कारवाई करावी. अशा प्रकारचे शासनाचा लाखो रुपयांचा निधी लाटला गेला आहे. सदर कामाची तात्काळ चौकशी होऊन यामध्ये संबंधित कर्मचारी, ठेकेदार यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 9 जुलै 2024 रोजी बुधवारी कृषी उत्पन्न उपबाजार बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रिया आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परंतु सायंकाळ उशिरापर्यंत कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी आले नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नांदगाव कृषी उत्पन्न व बाजार समितीच्या उपबाजार बोलठाण येथे निर्माणधिन असलेल्या धान्य शेडचा लोखंडी कैच्यांचा सांगाडा पडला आहे. शेड पडले नाही. त्यावर कोणतेही पत्रे अथवा छत नव्हते. लोखंडी सांगाडा वर चढवितांना कारागिराकडून काही तांत्रिक चूक झाल्याने सदर लोखंडी सांगाडा खाली कोसळला. याचा अर्थ शेड पडले असा होत नाही. सदर सांगाडा अतिशय मजबूत आहे. कोणतेही निकृष्ट दर्जाचे मटेरियल या ठिकाणी वापरण्यात आलेली नाही.
परंतु काही राजकीय सुरबुद्धीने बाजार समितीची लाहक बदनामी करत आहेत. निकृष्ट काम म्हणून ठिय्या आंदोलन करत आहे. सदर आंदोलनास राजकीय फुस असून हा एक राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्यक्षात सदर काम अतिशय दर्जेदार पद्धतीने होत असून सदर झालेला प्रकार हा अपघात आहे.
यामुळे संबंधित ठेकेदाराला योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सन 2021 / 22 मध्ये केलेल्या कामाबाबत तात्काळ ठेकेदाराने कार्यालय इमारत व तार कंपाऊंड चे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराचे अंतिम देयक बाजार समितीने दिलेली नाही. त्यामुळे कामात भ्रष्टाचार झाला हा आरोप पूर्णतः चुकीचा आहे. असे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बंडू पाटील यांनी म्हटले आहे.
परंतु सदरचा लोखंडी काय त्यांचा सांगाडा खाली कोसळला यामुळे जीवित हनी झाली असती तर कोण जबाबदार राहिले असते.. गेलेला जीव पुन्हा ठेकेदार अथवा संबंधित अधिकारी व शासन व शासन यांनी पुन्हा जिवंत केला असता का असा देखील सवाल बोलठाण परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. सन 2021-/ 22 मध्ये बांधलेल्या निकृष्ट दर्जाचे कार्यालयाचे कामात ठेकेदाराचे देयक थांबविण्यापेक्षा त्याचे असलेले लायसन रद्द करण्यासाठी प्रस्ताव नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने का दिले नाही. व त्याची लायसन रद्द का केले नाही तसेच सध्या सदरचे काम करत असलेल्या ठेकेदाराचे विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याची देखील लायसन रद्द काय केले जात नाही. जीवित हानी झाल्यानंतर कारवाई होईल का असाही सवाल बोलठाण परिसरातील शेतकरी वर्ग व नागरिकांकडून केला जात आहे
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.