कांदा अनुदानापासून वंचीत शेतक-यां साठी आहेरांनी घेतली भेट
कांदा अनुदानापासून वंचीत शेतक-यां साठी आहेरांनी घेतली भेट
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 9जुलै 2024
मागील वर्षी भाव कमी असल्याने शासनाने कांदा उत्पादक शेतकरी याना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते ,त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला ,पण येवला तालुक्यातील 1668 शेतकरी अजुनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत ,बाजार समिती कडे विचारणा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने अनेक अखेर आज दिनांक 8 जुलै रोजी बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांनी थेट मंत्रालय गाठून मुख्य सचिव पणन श्री अनुप कुमार साहेब यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली ,तसे लेखी निवेदन ही दिले व वंचीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे असा आग्रह लावून धरला
यावेळी अनुप कुमार साहेबांनी पणन महासंचालक यांचा शी सम्पर्क करून माहिती घेतली ,तसेच येवला बाजार समितीचे सचिव यांच्याशी ही दूरध्वनीवरून माहिती घेतली व उपसचिव देशमुख साहेब यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले*
अनेक शेतकरी बांधवांनी अनुदाना बाबत अनेक वेळा विचारणा केली ,त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी अप्पर सचिव यांची भेट घेतली ,चर्चेतून असे लक्षात आले की याबाबत त्यांच्या कडे अहवाल आलेलाच नाही ,मग त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वंचीत शेतकरी बांधवाना न्याय देण्याची विनंती केली ,इथेच न थांबता अनुदान मिळेपर्यंत योग्य त्या व्यासपीठावर पाठपुरावा नक्की केला जाईल व माझे कर्तव्य पार पडण्याचा आटोकाट पर्यन्त करत राहील –सचिन आहेर ,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये