वेगवान नाशिक
Nashik Bus Accident Video: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे एक बस दरीमध्ये कोसळळी आहे. अपघाताच्या वेळी नैसर्गिक दृश्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेची नोंद केली आहे.
एका वळणावर बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे
. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 70 प्रवासी होते, जे सर्व सुरतचे होते. ते गुजरातचे असल्याचे सांगण्यात येत आहे. घटना ७ जुलैची आहे. या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.