नाशिक शहर

मनसेच्या वतीने महापालिकेचा द्वारावर रस्त्यावरची ‘खडी ‘ ओतून आंदोलन.


वेगवान नाशिक

नाशिकरोड 8 जुलै 2024

नाशिकरोड येथील बिटको पॉईंट ते जेलरोड चा मुख्य रस्ता तसेच प्रभागातील परिसर जयभवानी रोड , सिन्नर फाटा , मोटवाणी रोड , गंधर्व नगरी , विहित गांव , जेल रोड व प्रभाग २० मध्ये सद्गुरूनगर, भालेराव मळा , जगताप मळा व इतर ठिकाणी पावसामुळे उखडला गेलेला कॉलोनी रस्त्या मुळे रस्त्यावर खडी झालेली आहे व खड्डे निर्माण झाले याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने महापालिकेचा द्वारावर रस्त्यावरची ‘खडी ‘ ओतून आंदोलन केले या वेळी मनसेचे शहर संघटक अ‍ॅड . नितीन पंडित , विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल , प्रमोद साखरे , विनायक पगारे , शशी चौधरी बाजीराव मते ,नितीन धानापुणे, भानुमती अहिरे , मीरा आवारे, विजय बोराडे आधी उपस्थित होते.यावेळी विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

नाशिकरोड येथील बिटको पॉईंट ते जेलरोड चा मुख्य रस्ता तसेच प्रभागातील परिसर जयभवानी रोड , सिन्नर फाटा , मोटवाणी रोड , गंधर्व नगरी , विहित गांव , जेल रोड व प्रभाग २० मध्ये सद्गुरू नगर, सद्गुरूनगर, भालेराव मळा , जगताप मळा व इतर ठिकाणी एम जी एन एल कंपनीचे गॅस पाइपलाईन टाकण्याच्या कामासाठी कॉलोनी रस्ता खोदण्यात आला होता व काम झाल्या नांतर ठेकेदारांनी वरच्या वर मुरूम माती टाकून रस्ता व्यवस्तिथ करण्याचा प्रयत्न केला , मनसे ने यावर आवाज उठवल्यानंतर महापालिकेने ठेकेदारा द्वारे वरच्या वर रस्त्याचे डांबरीकारन केले त्यामुळे कॉलोनी मधील रस्त्यांची लेवल बिघडली व रस्त्यांचे आकार बिघडले आहे., त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरती साठत आहे व रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे , नाशिक मध्ये २ ते ३ दिवसांपासून पावसाची संतधार चालू आहे , पावसामुळे रस्ते उखडले गेले आहे व रस्त्यावरती खडीच खडी आहे व खड्डे आहेत . नागरिक या रस्त्याच्या दुरावस्थे मुळे त्रस्त आहेत , तसेच गेल्या ४ ते ५ महिने बिटको पॉईंट ते जेलरोड भूयारी पाईपलाईन चे सुरु असलेले काम पूर्ण होऊन दोन महिने झाले आहेत , रस्त्यावरती फक्त मुरूम माती टाकून खोदलेले खड्डे बुजवलेले आहेत येथे देखील रस्त्यावरती खडीच खडी आहे व खड्डे आहेत.

मनसेने मागणी केली आहे कि बिटको पॉईंट ते जेलरोड चा मुख्य रस्ता , तसेच कॉलोनी रस्ते नव्याने डांबरीकरन करून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अन्यथा नागरिकांन सह मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे वतीने देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!