नाशिक क्राईम

NASHIK नाशिकः झोपेत खुन करणारे आरोपींना टपरीवरचं धरलं (व्हिडीओ )


वेगवान नाशिक / बाशित कुरेशी

नाशिक, ता. 7 जुलै 2024- पंचशील नगर येथील खुनाचे गुन्हयातील आरोपी भद्रकाली पोलीसांचे ताब्यात “भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची व गुंडा विरोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”°

दि. ०५/०७/२०२४ रोजी पहाटे ०३:३० वा. चे सुमारास मयत पांडुरंग उर्फ पांडया हनुमान शिंगाडे हा त्याचे राहते घरात, दुर्गा माता मंदीराचे मागे, पंचशील नगर, गंजमाळ, भद्रकाली, नाशिक येथे झोपलेला असतांना कैलास गायकवाड व त्याचे दोन साथीदार अशांनी मिळुन कोयता व चॉपरने त्याचे डोक्यावर, छातीवर व बरगडीजवळ वार करून जिवे ठार मारले बाबत मयताचा भाऊ विकास हनुमंत शिंगाडे याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. २३१/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०३(१), ३(५), ३५१(२) (३) अन्वये दि.०५/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गंभीर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन अटक करणे बाबत मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आदेश दिले होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

त्याअनुषंगाने श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक, (प्रशा.) भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि/वसंत पवार यांचे अधिपत्याखाली कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक असे गुन्हा घडल्यापासुन गुप्त बातमीदारांचे मार्फतीने व तांत्रिक पध्दतीने सदर गुन्हयातील आरोपीतांचा कसोशीने तपास करीत असतांना सदर आरोपी हे सातपुर परीसरात असल्याबाबत गुन्हे हे शोध पथकाचे पोहवा / २७५ कयुम सैय्यद व पोना /२४१ अविनाश जुद्रे यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि /वसंत पवार व पथक अशांनी सातपुर परीसरात जावुन सदर आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी नामे कैलास नंदु गायकवाड रा. पंचशील नगर, भद्रकाली, नाशिक व एक विधी संघर्षित बालक असे दोघे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे केलेल्या तपासा दरम्यान त्यांचेत असलेल्या जुन्या वादाचे कारणावरून मयत पांडुरंग शिंगाडे यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्हयातील तिसरा आरोपी नामे ऋतिक उर्फ लाडया रामदास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. पंचशील नगर, नाशिक यास गुंडा विरोधी पथक, नाशिक शहरचे सपोनि /ज्ञानेश्वर मोहीते व पथकाने ध्रुवनगर, गंगापुर परीसरातुन ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक (प्रशासन), भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि /वसंत पवार, सपोउनि/यशवंत गांगुर्डे, पोहवा / ३७४ नरेंद्र जाधव, पोहवा /१८१० सतिष साळुंके, पोहवा/१८१६ संदीप शेळके, पोहवा/२७५ कय्युम सैय्यद, पोना /२४१ अविनाश जुद्रे, पोना / २५०२ लक्ष्मण ठेपणे, पोना /१७९२ महेश बोरसे, पोशि/१९८६ निलेश विखे, पोशि/२७२२ दयानंद सोनवणे, पोशि/१४६ नारायण गवळी, पोशि/९९८ गुरू गांगुर्डे, पोशि/२११३ योगेश माळी, पोशि/२७४७ जावेद शेख, पोशि/२३५२ सुरज पगारे अशांनी तसेच गुंडा विरोधी पथकाचे सपोनि/ज्ञानेश्वर मोहीते, पोहवा /१०३३ विजयकुमार सुर्यवंशी, पोना/प्रदीप ठाकरे, पोशि/१५० गणेश भागवत, पोशि/७७ अक्षय गांगुर्डे व पोशि/२४३७ प्रविण चव्हाण अशांनी पार पाडली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!