देवळा तालुक्यात विश्वासघात;55 लाखांची फसवणूक बॅंकेत झाला गफला
वेगवान नाशिक
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा, ता. 7 जुलै 2024- संगनमताने शुध्द सोने, योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर करून विश्वासघात व बँकेची चौपन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दि देवळा मर्चेंट को.ऑप. बँक देवळा बैंकेचे व्हॅल्युअर राजेंद्र मोतीराम सोनवणे ( वय-५० वर्षे ) रा. कापशी यांच्यासह सव्वीस सोनेतारण कर्जदारांवर देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकारामुळे बँकेचे सभासद व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बँकेचे व्ह्याल्युअर राजेंद्र सोनवणे यांनी खातेदार यांच्या सोने चांदी तारण ठेवतेवेळी सोन्या चांदीची शुध्दता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक असतांना त्यांनी सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ कालावधीत खातेदार यांच्याशी संगणमत करून खातेदार यांचे सोने गहाण ठेवतेवेळी त्रुटी व तफावत सदोष, असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बैंकेत तारण म्हणुन ठेवले व नमुद बँकेत सोने हे शुध्द, योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला व त्या अहवालावरून बँकेने नमुद २७ आरोपी खातेदारांना ५४,७४,००० रू. मंजुर केले. त्यामुळे बँकेची एकुण ५४,७४०००/- व अधिक येणे व्याज रूपयांची फसवणुक झालेली आहे याप्रकरणी बँकेचे प्रशासकीय अधिकारी सुनील पोपटराव भालेराव यांनी शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी देवळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील करत आहेत. सदर घटनेमुळे बँकेचे सभासद व ठेविदरांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झालेले संशयित पुढील प्रमाणे १) राजेंद्र मोतीराम सोनवणे रा. कापशी, २) देवळा राकेश माणिक आहिरे रा. कापशी, ३) भाउसाहेब नथु जाधव रा. भिलवाड, ४) नारायण गणपत पवार रा. गुंजाळनगर, ५) भाऊसाहेब दादाजी शिंदे रा. कापशी, ६) मुकेश सुभाष निकम रा. वाखारवाडी, ७) आबाजी सुकदेव भदाणे, ८) मधुकर सिताराम पगार, ९) देविदास छगन बडनेरे रा. गुंजाळनगर, १०) भास्कर पांडुरंग आहेर रा.देवळा, ११) प्रविण घनश्याम आहिरे रा. देवळा, १२) गौरव सुरेश आहेर रा. देवळा, १३) लक्ष्मण बाबुराव मल्हाणे रा. वरवंडी, १४) युवराज गंभीर मेधने रा. सरस्वतीवाडी, १५) बाळासाहेब सुकदेव आहेर रा.वाखारी रोड, १६) केशव सुरेश आहेर रा. विठेवाडीरोड, १७) गोरख अर्जुन भदाणे रा. कापशी १८) विठेाबा वामन भदाणे, १९) शांताराम विठोबा भदाणे रा. कापशी २०) अनिल लक्ष्मण धोंडगे रा.गुंजाळनगर, २१) जिभाऊ दादाजी गुंजाळ रा. गुंजाळनगर, २२) बापु उत्तम खैर रा.मकरंदवाडी, २३) दिपक रघुनाथ निकम रा.सुभाषनगर, २४) सुरेश निंबा पगार रा. रामेश्वर, २५) दिलीप मोतीराम शेवाळे, २६) भरत मुरलीधर शिरसाठ रा. गुंजाळनगर, २७) नामदेव पंडीत थोरात रा. पिंपळगाव (वा. )