ब्रेकिंग बातमी- नांदगाव तालुक्यात बाजार समितीचे शेड कोसळलें व्हिडीओ पहा
ब्रेकिंग बातमी - नांदगाव तालुक्यातील उप बाजार समितीचे शेड कोसळले
वेगवान नासिक / wegwan NASHIK
नांदगाव ,दि.6 जुन 2024 शनिवार , प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील गोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे आवारातील सुरू असलेले बांधकामाचे शेड कोसळले असून जीवित हानी टळली.
बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे आवारात निकृष्ट दर्जाचे शेडचे काम सुरू असून ते शेड उभे राहण्याच्या आधीच दिनांक 5 जून 2024 रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खाली पडले. मार्केट बंद असल्यामुळे जीवित हानी टळली.
सदरचे शेडचे काम हे ठेकेदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांचे संगणमत असल्याचे सध्या पडलेल्या शेडच्या कामामुळे सिद्ध झाल्याचे दिसून येते. या आधी देखील बोलठाण येथील कृषी उत्पन्न व बाजार समितीच्या आवारात अशाच प्रकारे बोगस कामावर लाखो रुपयांची लूट करून कामे केल्याचे निश्चित दिसून आले असून त्याचे आज ज्वलंत उदाहरण सध्या घडलेल्या घटनेवरून दिसत आहे.
सन 2021/2022 मध्ये बोलठाण कृषी उत्पन्न उप बाजार समिती येथे ऑफिस बांधकामासाठी 16 लाखाची इमारत तर 14 लाखाची कंपाऊंड केले गेले असून इमारत व कंपाऊंड चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्या इमारतीचे शेत गळत आहे. व आतील खोलीतील फरशी देखील खाली गेली आहे. सदरची ऑफिसची इमारत विना वापराचे आहे यात देखील ठेकेदार आणि कृषी उत्पन्न खूप बाजार समितीचे सचिव यांच्या संकट मताशिवाय हे शक्य नाही. कारण त्या ठेकेदाराच्या विरोधात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासंदर्भात सचिव यांनी कार्यवाही केलेली दिसत नाही.
कृषी उत्पन्न बाजार समिती बोलठाण येथे सुरू असलेल्या कामाचे शेड कोसळले यात जीवित हानी झाली असेल तर याला कोण जबाबदार राहिले असते? असा सवाल शेतकरी वर्ग व नागरिक करत आहेत. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याची लायसन बुद्ध करण्यात यावे व कृषी उत्पन्न उपवास समितीचे सचिव यांच्यावर देखील कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावा अशी मागणी गोलठणघात माझ्यावरून जोर धरू लागली आहे. घडलेल्या घटनेबाबत शासन व प्रशासन अधिकारी काय दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.